बघता बघता नवीन वर्षाचा सहावा दिवस आलासुद्धा. मागचं वर्ष किती पटकन गेलं नाही, असं म्हणत म्हणत आपण सरत्या वर्षाला निरोप देतो. अगदी नववर्षाच्या आगमनाची पार्टी नाही केली तरी भिंतीवर नवीन कॅलेंडर तर लावतोच, मग सहज त्या त्या महिन्यात काय विशेष आहे, सुटय़ा कधी आहेत, मुलांची चाचणी किंवा प्रिलिम कधी आहे, कोणाचा वाढदिवस आहे का हे तर पाहतोच. अनेक जण नवीन डायरीत उत्साहाने लिहायची सुरुवात करतात. नवीन वर्षाचे संकल्प हा तर विनोदाचा जुना विषय. तरीही आपण काहीतरी वेगळं करायचं ठरवतोच, तो मनुष्यस्वभावच आहे. वचने किं दरिद्रता, असे म्हटलेच आहे ना नाहीतरी. सकाळी लवकर उठून चालायला जाणे, वजन कमी करणे, दैनंदिनी लिहिणे हे सर्वाधिक लोकांचे संकल्प असतात. आणि आजूबाजूला पाहिलेत तर ते पूर्ण करणाऱया व्यक्तीही असतात बरे. सगळेचे काही आरंभशूर नसतात. बरे रोज नाही, तर आठवडय़ातून दोन दिवस चाललात, तरी शरीरावर चांगला परिणाम होणारच आहे. त्यामुळे जे काही ठरवाल ते जमेल तसे आणि जमेल तेव्हा करणे महत्त्वाचे.
यंदाचा माझा संकल्प आहे प्रकृतीची काळजी घेणे आणि छोटय़ामोठय़ा तक्रारींकडे दुर्लक्ष न करणे. या वयात होतं असं सगळय़ांनाच, त्यात काय एवढं, डॉक्टरकडे जाऊन तरी काय होणार आहे मोठं, असा विचार करून घरातच असलेल्या औषधाच्या गोळय़ा कोणाच्या नकळत गिळणे हा बहुतांश स्त्रियांना जडलेला मोठा रोग असतो. त्याचे दुष्परिणाम अनेक जणींना भोगावे लागतात. घरच्यांना न सांगून त्यांना जे टाळायचं असतं, ते आजार वाढल्यावर टाळता येत नाही, हे या लक्षातच घेत नाहीत. प्रत्येकीवरच संसाराची, कार्यालयाची, कुटुंबाची अशा अनेक जबाबदाऱया असतात. त्या पेलण्यासाठी सक्षम राहावे यासाठीच हा दुर्लक्षाचा रोग आपल्याला लागू नये, याची काळजी घेणे महत्त्वाचे. आयुष्याचा आनंद स्वत:ला मनसोक्त घेता यावा आणि आपल्यामुळे तो इतरांना मिळावा, यासाठी हा माझा संकल्प तुम्हीही करणार ना?
6-1-2012

Comments
Post a Comment