नव्या वर्षाचे तीन महिने संपले सुद्धा. आर्थिक वर्षही संपले त्यामुळे बँका किंवा अकाउंट्स खात्यात काम करणाऱया व्यक्तींची झोप उडाली असेल. आणखी आठवडा जाईल हिशोब निस्तरता निस्तरता. मग याच निमित्ताने घरातल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्यायला काय हरकत आहे? जानेवारीपासून प्राप्तीकर कापला जातो, त्यामुळे पगार थोडा कमीच हातात येतो. पण एप्रिलमध्ये अप्रेझल होतात खाजगी कंपन्यांमध्ये म्हणजे पगार वाढणार आता. मग त्यातून बचत किती, खर्च किती आणि गुंतवणूक किती याचं गणित मांडायला हवं. माझ्या ओळखीच्या एक काकू आहेत, त्यांनी सुरुवातीपासून ठरवलं होतं की हातात येणाऱया पगारापैकी निम्माच घरात आणायचा, म्हणजे निम्माच खर्च करायचा. बाकीचा गुंतवायचा किंवा बचत खात्यात ठेवायचा. काका अचानक खूप लवकर गेले पण त्यांच्या या सवयीमुळे काकूंना घर एकटीच्या जबाबदारीवर चालवताना पैसा कधी कमी पडला नाही. त्यांच्यावर अवलंबून असणाऱया दोन व्यक्ती घरात आहेत, त्याही निवृत्त होऊन पाचसहा वर्षं लोटलीत. पण त्या आज अभिमानाने आणि आनंदाने जगतायत. कशासाठीही त्यांना कोणाकडे हात पसरावा लागत नाही.
मला नेहमी वाटतं त्यांचं उदाहरण सर्वांना द्यावं, विशेषत: आता महिना लाखभर रुपये पगार कमावणाऱया माझ्या मित्रमैत्रिणींना. मला माहीत आहे की आजकाल घरांच्या किमती इतकी जास्त झाल्या आहेत की गृहकर्ज डोक्यावर असेल तर आवश्यक खर्च केल्यानंतर बचतीसाठी पैसेच शिल्लक राहात नाहीत. पण बचत करायचीच असा निश्चय केला की सगळं जमतं. कर वाचवण्यासाठी नाही का गुंतवणूक करत आपण, परवडत नसूनही? मग, बचत का नाही जमत? त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, तेही कुटुंबातील सर्वांनी, हे मात्र खरं. आवश्यक खर्चाच्या यादीतील काही घटक अनावश्यक ठरवले काही काळाकरता की थोडे तरी पैसे वाचतातच. आता या यादीत तुम्ही कोणते घटक टाकाल बरं? सर्वांनाच त्याचा फायदा होईल ना.

A very well post. I liked the post and have also bookmarked you. All the best for future endeavors
ReplyDeletesprouted grain flour