टीव्हीने आपल्या सर्वांच्या आयुष्यावर केव्हाच ताबा मिळवला आहे. वय, लिंग, जात, धर्म, व्यवसाय या सगळय़ांच्या पलिकडे हे वेड पसरलेलं आहे. वेड म्हणजे नुसतं मालिकांच्या आहारी जाणं नव्हे तर मोकळा वेळ मिळाला की (की वेळ काढून?) टीव्हीच्या डबडय़ासमोर जाऊन बसणे. अनेक आया, विशेषकरून एकटय़ा राहणाऱया, कामाच्या वेळेत मुलाला टीव्हीसमोर नेऊन बसवतात आणि कामं आटपून घेतात. निवृत्त स्त्रीपुरुषांना तर खूप वेळ असतो आणि टीव्ही आता 24 तास सुरू असतो. घर सांभाळणाऱया गृहिणी आपापल्या आवडीच्या मालिकांच्या वेळानुसार कामं करतात. रात्रीचा वेळ बहुधा पुरुषमंडळींना बातम्या पाहायला ठेवलेला असतो. अनेकांकडची जेवणं टीव्हीसमोर बसून होतात. आपण मोठेच असं करतो तर मुलं तरी कशी मागे राहतील बरे?
खरं तर टीव्ही किंवा संगणक या गोष्टी अशा आहेत की ज्यावर शाळांमध्ये निबंध लिहावेत ‘टीव्ही/संगणक : शाप की वरदान?’ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट हे आपण लहानपणापासून शिकलेलो असतो. ‘अति तिथे माती’ ही म्हण सातआठ वर्षांच्या लेकरालाही माहीत असते. पण प्रत्यक्ष जीवनात आपण त्याचं महत्त्व विसरतो आणि माती खातो. टीव्हीच्या बाजूचे लोक हमखास नाव घेतात ते डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, बीबीसी, ऑलिम्पिक किंवा इतर क्रीडास्पर्धा यांचं. टीव्हीचे विरोधक बोटं मोडतात ते बहुतकरून कार्टून्स, मालिका आणि तथाकथित अश्लील कार्यक्रमांच्या नावाने. एकाच टीव्ही संचावर हे सगळे कार्यक्रम दिसतात. कोणता कार्यक्रम लागणार ते टीव्हीसमोर बसलेल्या व्यक्तीवर अवलंबून असतं. रिमोट आपल्याच हातात असतो, हे लक्षात ठेवलं की वादाचा मुद्दा उरत नाही. पण त्यासाठी थोडं खंबीर व्हावं लागतं, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे हे ठरवून त्यासाठी वेळ काढावा लागतो, मुलांचा वेळ जावा म्हणून प्रयत्न करावे लागतात.
या पार्श्वभूमीवर आजच्या मधुरिमामधले लेख वाचले जावेत अशी अपेक्षा आहे. यात टीव्ही नसलेल्या घराची गोष्ट आहे तशीच मालिका लिहिणाऱया एका लेखकाचं मनोगत आहे. सुटीत मुलांसाठी काय कराल, हे सांगणारा लेख आहे तसंच काय करू नका, हे सांगणाराही.
तुम्ही कुठल्या बाजूचे आहात, ते सांगणार ना आम्हाला?

Comments
Post a Comment