मुलीची नवीन घेतलेली चमकी तिला सापडत नव्हती आणि दोन दिवस ती माझ्या मागे लागली होती, शोध म्हणून. एवढंही म्हणून झालं होतं की चमकी मलाच कुठेतरी, म्हणजे नको त्या ठिकाणी, सापडली म्हणून मी ती लपवून ठेवली होती. तिचा बाबाही घरी होता तेव्हा. मी सहज म्हटलं, ‘अगं, बाबाला का नाही सांगत गं शोधायला?’ त्यावर तिने दिलेलं उत्तर मासलेवाईक होतं. ‘माझे नि त्याचे डोळे एकसारखेच आहेत.' तुझे डोळे वेगळे आहेत, तू तुझ्या डोळ्यांनी शोधलंस की सापडतात गोष्टी.’
आता हातातलं काम टाकून चमकी शोधणं भागच होतं ना मला. अनेकदा असं होतं, तिला शाळेचा शर्ट सापडत नसतो सकाळी घाईच्या वेळी आणि मला तो समोरच दिसतो कपाटात. किंवा स्वयंपाकघरातल्या कपाटातली जिºयाची बाटली मला दिसत नाही, खूप शोधूनही आणि आई कपाट उघडून म्हणते, ही काय, समोरच तर आहे. परवा नवरा बाहेरगावी निघाला होता पहाटे आणि त्याला पैशाचं पाकीट काही सापडेना. कपाट रिकामं केलं, रोजची आॅफिसची बॅग पाहिली, काल रात्री कधी काढलं होतं, रिक्षात राहिलं का, त्यात काय काय आहे, वगैरे चर्चा झाली. म्हणाला, मी आठवणीनं ठेवलंय या बॅगेत, आता सापडतच नाहीए. आपण एकदा पाहावं म्हणत बॅगेत हात घातला तर पाकीट! तर म्हणतो, मी तीनदा या कप्प्यात पाहिलं पण मला सापडलंच नाही. शोधणारा माणूस काही वरवर पाहत नसतो, त्याला ती हरवलेली वस्तू तातडीने हवीच असते. मग ती त्याला दिसत नाही आणि दुस-याला लगेच दिसते, खरोखरच ती समोरच असते. तरीही असं का व्हावं बरं? असंही नाही की घरातल्या एकाच माणसाला वस्तू सापडतात. ज्याची वस्तू हरवलेली असते त्याला ती सापडत नाही, दुसºयाला लगेच दिसून येते, एवढं खरं. तुम्हाला आलाय असा अनुभव कधी?

माझा तर हा रोजचाच अनुभव आहे...फक्त शिधणारी व्यक्ती मी नसून माझी मुलगी असते...मला समोरच असलेली वस्तू न दिसण्याचा रोग आहे. मी दोन चष्मे केलेले आहेत तरीही माझे दोन्ही चष्मे दिसेनासे होतात...दिवसातून अनेकदा! दिवसेंदिवस हा आजार बळावतच चाल्लेला आहे- माझ्या मुलीला बिचारीला कधीकधी माझी खूप काळजी वाटते - "कसं होणार तुझं?" असं म्हणते न मुकाट्याने वस्तू शोधाय्ला निघते - तर समोरच ती वस्तू तिला दिसते...आता काय म्हणावं या प्रकाराला?
ReplyDeletei can imagine the situation. poor Mukta:-)
ReplyDelete