ती एका मैत्रिणीला सोबत म्हणून हॉस्पिटलमध्ये होती मागच्या रविवारी. संध्याकाळी पाचच्या सुमाराला तिच्या मुलीचा फोन आला, आवाज एकदम उत्साहित, आनंदित.‘ ममा, इमॅजिन आज काय झालं असेल?’ ‘काय गं, आज तर तू इंग्लिश विंग्लिश पाहायला जाणार होतीस ना. मग झालं काय नक्की?’ ‘अगं, आम्ही तिघी गेलो मॉलवर तर त्या एकदम म्हणाल्या, चल, सिनेमा नको, काहीतरी खाऊया, खूप भूक लागलीय. माझ्याकडे तर पैसे नव्हते गं आई, मी सिनेमाच्या तिकिटापुरते नेले होते.’ ‘मग, आम्ही एका रेस्तराँमध्ये गेलो. तर तिथे माझा शाळेचा सगळा ग्र्रुप समोर. मी म्हणतेय, ‘तुम लोग इधर क्या कर रहे हो?’ तर त्यांनी एकदम गायला सुरुवात केली, ‘हॅपी बर्थडे टू यू.’ मग केक आला, सर्वांनी मनसोक्त खाल्लं, मलाच त्यांनी बर्थडे ट्रीट दिली. मग मला त्या दुकानात घेऊन गेल्या, तिकडे आम्ही असंच गमतीत काही टॉप्स ट्राय करत होतो. एक खूप छान होता, तर त्यांनी मला तो देऊनच टाकला भेट म्हणून. आई, इतकी मजा आली म्हणून सांगू. मी कधी कल्पनाही नव्हती केली असं काही होईल याची. दोन महिन्यांपासून ते पार्टी प्लॅन करत होते, मला नकळत. आय अॅम सो हॅपी!’ ‘येस बेबी, यू आर व्हेरी लकी टू हॅव सच फ्रेंड्स. सांभाळून ठेव सगळ्यांना.’ फोन ठेवल्यावर ती विचारात पडली.
माझी मुलगी खरंच एवढी स्पेशल आहे तिच्या मित्रमैत्रिणींसाठी? आणि आपण तिला नेहमी म्हणायचो, मैत्रिणींशी नीट बोल, नीट वाग, अजून तुमची मैत्री तयार होतेय, तिला फुलायला, वाढायला वेळ लागेल. मग ती घट्ट होईल आणि नंतर कधीतरी तू त्यांच्याशी रागावून बोललीस, वेळ नाही दिलास तरी त्या समजून घेतील. आत्ता जपूनच वागलं पाहिजे. तिला याही गोष्टीचा आनंद झाला की फेसबुकवर सगळं काही साजरं करायच्या या दिवसांतही या मुलांनी तिच्या लेकीसाठी प्रत्यक्ष पार्टीचं एवढं छान प्लॅनिंग केलं, प्रत्यक्ष भेटून वाढदिवस साजरा केला. आपल्या मुलीला 15व्या वर्षी एवढं छान फे्रंड सर्कल आहे, याचं तिला खूप अप्रूप वाटलं. तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला आहेत असे छान मित्रमैत्रिणी?

Comments
Post a Comment