एक लेख पाकिटातून बाहेर काढला, तर त्याला लावलेली पिन नीट नव्हती म्हणून मी ती काढली. पाहते तर हातात चक्क एक सुई होती. कागदाला सुई लावलेली पाहून मी चाट पडले. मग लक्षात आलं की टाचणी मिळाली नाही म्हणून कागद सुटे कसे पाठवायचे, असं वाटणा-या वाचकाने सुईने ते टाचून पाठवले होते. याला म्हणतात वेळ निभावून नेणं. मग आणखी काय काय आठवलं आपण वेळ निभावण्यासाठी करतो ते. ब-याचदा ते वेळ मारून नेणं होतं, हा थोडा वाईट भाग.
स्वयंपाकघरात तर अशी वेळ सगळ्यांवर येतच असते. गूळ संपला म्हणून साखर, हिरव्या मिरच्या नसतील तर लाल सुक्या मिरच्या, चटणीसाठी ओला नारळ नसेल तर भिजवलेल्या चणाडाळीची चटणी वाटायची असे अनेक प्रकार स्वयंपाकघरात करावेच लागतात. एवढंच काय पाणी नसेल, म्हणजे घरात अजिबात पाणी शिल्लक नसेल आणि हॉटेलमध्ये जाऊन खायचं नसेल तर अंड्याचं ऑम्लेट/भुर्जी करता येते, पाण्याचा एकही थेंब न वापरता. ब्रेड किंवा पाव आणला की झालं.
मुख्य मुद्दा असा की अमुक एक गोष्ट नाही म्हणून काम अडू द्यायचं नाही; पण कधी कधी हे तत्त्व फार ताणलं जातं. नवी साडी घेतली की त्यावर मॅचिंग ब्लाउज शिवायच्या ऐवजी घरात असलेलाच एखादा मॅच होतोय का पाहायचं, परकरही असाच कुठला तरी घरी असेल तो घालायचा. अशाने होतं काय की त्या नव्या साडीची अगदी रया जाते. म्हणजे या ठिकाणी वेळ निभावण्याऐवजी वेळ मारून नेलेली असते आणि ते इतरांना कळून चुकतं. हे करावं लागू नये म्हणूनच आवश्यकता असते नियोजनाची, हो ना?

Comments
Post a Comment