त्या दिवशी तिला ऑफिसमधून निघायला उशीर झाला. एका सहका-याने म्हटलं, मी माझ्या गाडीवरून सोडतो मॅडम, काळजी नका करू. हा सहकारी तिच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी लहान पण रोज भेटणारा, गप्पा मारणारा. पण जवळचा मित्र नव्हे. ती गाडीवर बसली, अंतर राखून. त्याच्या खांद्यावर हात मात्र ठेवावा लागलाच. कारण रस्ता खडबडीत होता. अर्ध्या तासातच ती घरी पोचली. रोजची बसची धावपळ, उभ्याने करावा लागणारा प्रवास, चालणं टळलं होतं म्हणून ती अगदी आनंदात होती. पण दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर तिला जाणवलं की अंग आखडलंय काहीसं. कशाने असेल, असा विचार केला तर तिच्या लक्षात आलं की काल बाइकवर अर्धाच तास का होईना ती एकदम ताठ, पाठीला आधार न घेता, बसली होती आणि तेही समोरच्या सहका-याला फारसा स्पर्श तर होत नाहीये या तणावाखाली. तिला हसूच आलं स्वत:चं. त्याला अगदी निर्हेतुक स्पर्शसुद्धा होऊ नये, अशी काळजी ती का घेत होती बरे?
खरं तर तिचे जवळचे मित्र होते काही. म्हणजे नवरा वगळता या तथाकथित ‘पर’पुरुषांचा स्पर्श तिला चालत असे. अनेकदा आॅफिसातल्या इतर सहका-यांना टाळी देणं, पाठीवर थाप मारणं, हेही होत असे. मग कालच असं का झालं? की हा सहकारी वयाने खूपच लहान होता, खेरीज आॅफिसात खूप ज्युनियर होता, म्हणून ती अंतर राखून होती? काही असो, तिने मनाशी ठरवून टाकलं पुन्हा कधी बाइकवर बसायचं झालंच तर नवरा किंवा एखाद्या जवळच्या मित्रासोबत. निर्धास्त. अवघडून बसण्यात प्रवासातली मजा तर नव्हतीच, उलट त्रासच होता.
का आपण असं स्पर्शांना वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये टाकतो? हा चालेल, हा नाही चालणार, हा तर अगदीच नकोसा तर एखादा अगदी हवाहवासा. आणि जेव्हा नकोसा स्पर्श टाळता येत नाही, तेव्हा जी घालमेल होते तिचं काय? अगदी कसनुसं होऊन जातं, कधी एकदा लांब जातो असं होतं. काय आहे स्पर्शाचं स्थान आपल्या जीवनातलं? काही माणसं खूप जास्त संवेदनशील असतात का स्पर्शाबद्दल आणि काही जणांना फारसा जाणवतच नाही स्पर्शास्पर्शातला फरक?

Comments
Post a Comment