विशिष्ट
वेळ, विशिष्ट कपडे, विशिष्ट खाणं, जायचा-यायचा विशिष्ट मार्ग असे आपल्या
सर्वांचेच काही कम्फर्ट झोन असतात. त्याला वयाची अट नसते. लहान असताना
सवयीची झालेली आजीच्या लुगड्याची गोधडी पंचविशीतही वापरणारी मुले जशी आपण
पाहतो तशीच रोजची वाट जराही न बदलणारी माणसेही. अनेक माणसे बाहेरगावी
जाताना आपली सवयीची विशिष्ट बिस्किटं सोबत घेऊन जातात. आपल्याला सवयीचे
वातावरण सर्वांनाच हवेहवेसे वाटते; पण त्याचा अतिरेक झाला तर नवीन काही
पाहण्याची संधीच अशी माणसे घेऊ शकत नाहीत. नवीन माणसे, नवीन जागा, नवीन
वास, नवीन चवी, नवीन शब्द या सगळ्यालाच ती मुकतात. उलट काही माणसे अशी
असतात ज्यांना नावीन्याचा जणू हव्यास असतो. प्रत्येक सुटीत नव्या ठिकाणी
फिरायला जातील, नवीन भाषा शिकतील, नवीन खाद्यपदार्थ चाखून पाहतील,
कपड्यांचे वेगवेगळे प्रकार वापरतील, अशी काही माणसे असतात. एक प्रकार असतो
कम्फर्ट फूड म्हणजे आपली मुगाची खिचडी किंवा वरणभात. गावाहून आल्यावर किंवा
खूप दिवसांनी घरी परतल्यावर फर्माईश होते ती खिचडीची. ती खाल्ल्यावर कसं
घरी आल्यासारखं वाटतं. परगावी शिकणाºया व सुटीत घरी येणाºया मुलांसाठी
रात्री-बेरात्रीही साधं वरण, भात आणि बटाट्याच्या काचºया अनेक जणींनी
केल्या असतील. त्या वेळेला वडापाव, पावभाजी, दोसा, बिर्याणी, पराठे असं
काही नको असतं, एरवी ते कितीही आवडीचं असलं तरी.
तशी असते आईची एखादी जुनी साडी. विटकी, पण मऊ. तिला कितीही सांगितलं ना ती आता टाकून दे तरी ती काही साडी टाकून देत नाही. कारण तिचा तो कम्फर्ट झोन असतो, दिवसभराच्या कामाने थकून झोपायच्या आधी ती साडी नेसली की तिचा थकवा जणू दूर होतो. लहान मुलांचेही असे आवडीचे, मऊ कपडे असतात जे कदाचित आईबापाच्या दृष्टीने जुने, तोकडे झालेले असतात पण त्यांचा तो कम्फर्ट झोन असतो.
तुमचा कम्फर्ट झोन काय आहे, सांगाल ना आम्हाला?

Comments
Post a Comment