आजचा
अंक आहे अर्थातच महिला दिन विशेषांक. संपूर्णपणे आपल्या पुरुष साथीदारांनी
लिहिलेला. अर्धे आकाश आपले, तर अर्धे त्यांचे हे आपण सुरुवातीलाच मान्य
केले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवांना त्यांच्याच शब्दांत तुमच्यासमोर
आणायचे ठरवले. काय काय आहे आजच्या अंकात? महिला दिनाची सुरुवात कशी झाली
आणि त्याचा उद्देश काय होता, याची आठवण करून देणारा लेख आहे. दोन्ही मुलीच
असलेल्या बापाचे मनोगत आहे. दिल्लीजवळच्या खेड्यांमधल्या तरुण मुलींच्या
जीवनाविषयी अत्यंत संवेदनशील निरीक्षण आहे. पुरुषार्थाकडे वेगळ्या नजरेने
दृष्टिक्षेप टाकणारा लेखही आहे, तर बायको ऑफिसात आणि नवरा गृहपती
अशांबद्दलही वाचायला मिळणार आहे.
ईव्ह अॅन्सलर लिखित ‘वजायना मोनोलॉग्स’ या मूळ इंग्रजी नाटकाचे वंदना खरेकृत मराठी रूपांतर ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ने नुकतीच प्रयोगांची शंभरी ओलांडली. स्त्रियांच्या लैंगिकतेसारख्या, खासगीतही अजिबात बोलल्या न जाणार्या विषयाबद्दल, सार्वजनिक ठिकाणी सादर होणार्या या नाटकामुळे हा विषय आजच्या सर्वच वयाच्या महिलांसमोर येणं किती आवश्यक आहे याची जाणीव झाली. योनी हा शब्द तुमच्या-माझ्यासकट किती जणींनी मोठ्याने किंवा मनातही उच्चारला असेल? योनीशी निगडित लैंगिक, आरोग्याचे, शारीरिक, मानसिक असे किती तरी अनुभव आपणा सर्वांनाच येत असतात, त्यासंबंधीचे प्रश्न आपल्यापैकी अनेकींना भेडसावत असतात आणि तरीही आपण गप्पच असतो. अगदी सुखाविषयीसुद्धा.
हे नाटक पाहून आलेली एका मैत्रिणीची सत्तरीच्या जवळ आलेली सासू नंतर एवढेच म्हणाली, ‘आपल्या कॉलनीतल्या सगळ्या बायकांना त्यांच्या मुली/सुना/नातींसोबत घेऊन गेले पाहिजे नाटक बघायला. तुम्ही या विषयावर मुली/नातींशी मोकळेपणाने बोलू शकत नसाल तर निदान नाटक तरी पाहिले पाहिजे त्यांच्यासोबत.’ या पावतीमुळेच हा विषय तुमच्यासमोर मांडायचे ठरवले. त्या अनुषंगाने या नाटकात काम करणार्या समीक्षाच्या नवर्याचे मनोगतही प्रसिद्ध करतोय. (त्यातील काही भाग कदाचित काही वाचकांना धक्कादायक वाटू शकेल अथवा अस्वस्थ करू शकेल; परंतु या नाटकाचे 100 प्रयोग झालेत म्हटल्यावर त्याच्याबद्दल चर्चा करणे महत्त्वाचे आहे. खुद्द नाटकाच्या सुरुवातीलाही, अस्वस्थ वाटल्यास इतर प्रेक्षकांचा रसभंग न करता बाहेर जाण्याचे आवाहन करण्यात येते व त्यास मान देऊन निवडक प्रेक्षक तसे करतातही. तर, या विषयावरील चर्चेसाठी महिला दिनाव्यतिरिक्त अधिक चांगले निमित्त कोणते? हा विषय गांभीर्याने घेण्यासारखा आहे, त्यामागे चेष्टेचा वा टवाळकीचा अंशही नाही, हे आपल्यासारख्या मधुरिमाच्या सुज्ञ वाचकांना मान्य असावे.)
अंक तुम्हाला आवडेल आणि नेहमीसारखा तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद द्याल, याची खात्री आहे.
अरे हो, महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्याच की!

Comments
Post a Comment