पाऊस अर्थात आवडतोच मला
पण नेमकं ऑफिसला निघताना येतो
मग चिंब भिजून प्रवास करायचा नि
दिवसभर एसीत कुडकुडायचं
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण मग गाडीवरून जाता येत नाही कुठेच
किंवा रेनकोट घालूनच वावरावं लागतं
पाऊस पडत नसला तरीही
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण नको वाटतात त्या प्लॅस्टिकच्या नि
रबराच्या, सतत चावणा-या चपला
वाटतं, कम्फर्टेबल नि परवडेबल
पावसाळी पादत्राणं कोणालाही
का नाही शोधावीशी वाटली अजून?
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण बस स्टॉपही गळकाच असतो
नि बसच्या खिडक्या बंद होत नसतात
आणि खड्ड्यांमुळे लडखडणा-या बसमध्ये
उभं राहिल्यावर हिंदकळणं जिवावर येतं
पाऊस अर्थात आवडतोच मला
धुतलेले कपडे वाळत घालायलाच
जागा पुरत नाही, त्यातच माणसं भिजून येतात
ते कपडे निथळायला ठेवायलाही जागा नसते
मग थोडी चिडचिड होतेच ना...
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण भाज्या महाग होतात, सारखी उसळ
नको म्हणतात घरातले सगळेच
सारखं चमचमीत खावंसं वाटत असतं
प्रत्येकालाच
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण तो आला की घरीच पांघरूण घेऊन
बसून राहावंसं वाटतं रोजच नि
कुणीतरी गरम चहा आणून ठेवावा समोर
मुलांना उठवायला नि पावसात शाळेला
पाठवायलाही नको वाटतं
पाऊस अर्थात आवडतोच मला.
पण नको वाटते ती साडी,
तो सलवार कुडता नि ओढणी
खांद्याला पर्स, भाजीची पिशवी नि
छत्रीचं लोढणं
आणि त्यातच कोकलणारा मोबाइल
पाऊस अर्थात आवडतोच मला.
पण त्यात नको वाटतात पाहुणे
नि नको वाटतं कुणाकडे जाणं
आठवत राहतात बसमध्ये किचाटात
वाहतूक खोळंब्यात काढलेले
ते तीन तास आणि कावलेले
प्रवासी, वाहक नि चालक
पाऊस अर्थात आवडतोच मला...
पण नेमकं ऑफिसला निघताना येतो
मग चिंब भिजून प्रवास करायचा नि
दिवसभर एसीत कुडकुडायचं
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण मग गाडीवरून जाता येत नाही कुठेच
किंवा रेनकोट घालूनच वावरावं लागतं
पाऊस पडत नसला तरीही
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण नको वाटतात त्या प्लॅस्टिकच्या नि
रबराच्या, सतत चावणा-या चपला
वाटतं, कम्फर्टेबल नि परवडेबल
पावसाळी पादत्राणं कोणालाही
का नाही शोधावीशी वाटली अजून?
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण बस स्टॉपही गळकाच असतो
नि बसच्या खिडक्या बंद होत नसतात
आणि खड्ड्यांमुळे लडखडणा-या बसमध्ये
उभं राहिल्यावर हिंदकळणं जिवावर येतं
पाऊस अर्थात आवडतोच मला
धुतलेले कपडे वाळत घालायलाच
जागा पुरत नाही, त्यातच माणसं भिजून येतात
ते कपडे निथळायला ठेवायलाही जागा नसते
मग थोडी चिडचिड होतेच ना...
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण भाज्या महाग होतात, सारखी उसळ
नको म्हणतात घरातले सगळेच
सारखं चमचमीत खावंसं वाटत असतं
प्रत्येकालाच
पाऊस अर्थात आवडतोच मला
पण तो आला की घरीच पांघरूण घेऊन
बसून राहावंसं वाटतं रोजच नि
कुणीतरी गरम चहा आणून ठेवावा समोर
मुलांना उठवायला नि पावसात शाळेला
पाठवायलाही नको वाटतं
पाऊस अर्थात आवडतोच मला.
पण नको वाटते ती साडी,
तो सलवार कुडता नि ओढणी
खांद्याला पर्स, भाजीची पिशवी नि
छत्रीचं लोढणं
आणि त्यातच कोकलणारा मोबाइल
पाऊस अर्थात आवडतोच मला.
पण त्यात नको वाटतात पाहुणे
नि नको वाटतं कुणाकडे जाणं
आठवत राहतात बसमध्ये किचाटात
वाहतूक खोळंब्यात काढलेले
ते तीन तास आणि कावलेले
प्रवासी, वाहक नि चालक
पाऊस अर्थात आवडतोच मला...
Comments
Post a Comment