मध्यंतरी एका पुरस्काराच्या निमित्ताने एक छान पुस्तक वाचायला मिळालं. ती होती रणजित लाल यांची ‘फेसेस इन द वॉटर’ ही कादंबरी. वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्याखेरीज हातातून खाली ठेवूच नये अशी.
यात गोष्ट आहे दिल्लीतल्या एका आठदहा वर्षांच्या मुलाची. त्याच्या श्रीमंत घराण्यात मुली जन्मालाच येत नाहीत, ही त्यांची ख्याती. या कुटुंबाचं मूळ घर दिल्लीच्या सीमेजवळ आहे, तिथे भरपूर जमीन आहे, आणि दोन नोकर आहेत. आणि आहे एक विहीर. काही कारणामुळे या मुलाला काही महिने या घरात या दोन नोकरांसोबत काढावे लागतात. आई बजावून सांगते, विहिरीकडे अजिबात जायचं नाही. मग, बालसुलभ उत्सुकतेने त्याला तिथे जावंच लागतं. पाण्यात वाकून पाहिल्यावर त्याला दिसतात पाच मुली, वेगवेगळ्या वयाच्या. हेच ते ‘फेसेस इन द वॉटर’ अर्थात पाण्यातले चेहरे.
या बहिणी त्याच्याशी बोलतात आणि त्याला समजतं की त्या त्याच्या बहिणी आहेत. त्याची आई आणि त्याच्या काकींना झालेल्या, जन्मल्या जन्मल्या विहिरीत सोडून दिलेल्या. म्हणजेच जणू त्या जन्मल्याच नव्हत्या. त्यांची त्या विहिरीत एक वेगळीच दुनिया आहे. त्या त्याच्या जगात येतात, तो त्यांच्यासोबत जगायचा आनंद घेतो. तो त्याच्या आणखी एका भावाला या गुपितात सामील करून घेतो. मग ही भावंडं खाऊची देवाणघेवाण करतात, खेळतात, त्यांच्या नावडत्या डॉक्टर काकीला खोड्या करून हैराण करतात. हळुवार अशा मुली प्रथमच इतक्या जवळून अनुभवणा-या गोष्टीच्या नायकाच्या वर्तनातही सुधारणा होते. हळूहळू त्याच्या आईवडिलांनाही तो आनंद समजतो आणि त्याच्या आईला नंतर झालेल्या दोन मुलींना जीवदान मिळते. अशी साधारण गोष्ट.
त्या मुली आणि त्यांचा हा भाऊ मिळून जी धमाल करतात, ते पाहता मुलगी घरात असणं म्हणजे केवढं मोठं आनंदाचं निधान आहे, हे मनाला पार भिडतं. हे पुस्तक साधारण 10 ते 15 वर्षांच्या मुलामुलींना खूप आवडेल वाचायला. त्या पिढीला मुलगे आणि मुलींमधला समतोल राखण्याचं महत्त्व कळणं आवश्यक आहे. हो ना?

Comments
Post a Comment