अनेक कार्यालयांमधून नाताळच्या आधी सिक्रेट सँटा हा गमतीशीर खेळ खेळला जातो. कार्यालयात असलेल्या सर्व व्यक्तींच्या नावांच्या चिठ्ठ्या करायच्या. सर्वांच्या हं, अगदी स्वच्छता कर्मचारी व उपाहारगृहातील कर्मचा-यांच्या नावांच्यासुद्धा. यातली एक चिठ्ठी प्रत्येकाने उचलायची, कोणाचं नाव आहे ते सांगायचं फक्त आयोजकांपैकी एकाला. आणि त्या व्यक्तीसाठी एक छानशी भेट आणायची. देणा-याचं नाव घेणा-याला कळू द्यायचं नाही, म्हणून याला म्हणायचं सिक्रेट सँटा. नाताळच्या आदल्या दिवशी या सगळ्या भेटी एकत्र करायच्या, नि कार्यालयातल्या कोणातरी विशेष व्यक्तीच्या हस्ते ज्याला त्याला द्यायच्या.
कार्यालय खूप मोठं असेल तर प्रत्येक जण काही सगळ्यांना ओळखत नसतो. मग फारशा ओळखीच्या नसलेल्या व्यक्तीचं नाव आलं तर लांबून ती व्यक्ती कोण आहे ते पाहायचं नि साधारण काय भेट आवडू शकते याचा विचार करून काहीतरी आणायचं. ओळखीची व्यक्ती असेल तर अशी नकळत भेट आणायची छानच संधी असते ही. आपल्याला काय मिळतंय याची उत्सुकता सर्वांच्याच चेह-यावर असते. काही लोकांनी खूप विचार करून भेट आणलेली असते. तर काही जण सोप्पा मार्ग निवडतात, मोठ्ठं चॉकलेट आणतात, सर्वांनाच आवडणारं म्हणून. यात कुठे स्पर्धा नसते कोणी किती रुपयांची भेट आणतंय याची. कारण देणारा पडद्याआड असतो. त्यामुळे आपली भेट अगदी इटुकलीपिटुकली दिसू नये, याची काळजी प्रत्येक जणच घेतो. आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या असल्या तरी काही भेटी त्यांच्या आकारामुळे लगेच ओळखू येतात. पण ज्यांचा अंदाज लागत नाही, त्यांच्याबद्दल उत्सुकता राहतेच.
देणं-घेणं हा आपल्याकडे एरवी मोजूनमापून हाताळला जाणारा विषय. त्यांनी आपल्याला इतकं दिलं होतं धाकटीच्या लग्नात, आपला आहेर तेवढाच किंबहुना थोडा वरचढच व्हायला पाहिजे. किंवा, ती त्या वहिनींनी दिलेली साडी आहे ना, ती कर इकडे, देऊन टाकून काकींना. असं काहीतरी. जिला भेट द्यायची आहे, मुद्दाम तिचा विचार करून, तिला आवडेल/वापरता येईल अशी भेट आपण फार कमी वेळा आणतो ना. पण आपल्याला असं काही कुणी दिलं की होणारा आनंदही खूप मोठा असतो. तरी का आपण थोडासा वेळ खर्च करत नाही यावर? जशी उत्सुकता घेण्याबद्दल असते तशी ती देण्याबद्दलही असावी ना आपल्या मनात?येऊ घातलेल्या वर्षाचे स्वागत या सिक्रेट सँटाच्या साथीने करायला आवडेल ना आपल्याला सर्वांनाच?

Comments
Post a Comment