रोजच्याप्रमाणे ऑफिसमध्ये आल्यावर चोखंदळ मित्रमैत्रिणींनी फेसबुकवर शेअर केलेले लेख चाळताना एका ब्रिटिश एकपात्री विनोदी महिला कलाकाराचं मनोगत वाचायला मिळालं. मिशेल अकोर्ट 21 वर्षं ‘स्टँडअप कॉमेडी शो’ सादर करतेय. तिने महिलांना विनोद कळत नाही का, अशा प्रकारच्या कलाकारांची संख्या कमी का, महिला म्हणून एकपात्री विनोदी कार्यक्रम सादर करताना काय आव्हानं आहेत वगैरे (विनोदी?) प्रश्नांना उत्तरं दिली आहेत ‘द गार्डियन’मधल्या या लेखात. त्यात तिने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. बायका जेव्हा गप्पा मारत असतात तेव्हा त्या खूप हसतात. अगदी डोळ्यांत पाणी येईपर्यंत किंवा पोट दुखेपर्यंत. लांबून पाहणार्याला वाटेल की त्या एखाद्या विनोदावर हसतायत; पण मिशेलचं निरीक्षण असं की, बायका एकत्र आल्यावर फार कमी वेळा विनोद सांगतात एकमेकींना. (ती मक्तेदारी पुरुषांची. ‘काय, कसा आहेस,’ असं एकमेकाला विचारून ‘अरे, काल एक जोक ऐकला बघ मस्त किंवा आत्ताच व्हॉट्सअॅपवर आलाय,’ असं म्हणत तो जोक शेअर करून हसणं ही त्यांची खासियत.) बायका मुख्यत्वे सांगतात आपापल्याच गोष्टी, आपण स्वत:च नायिका असलेल्या, आपल्याच आयुष्यात घडलेल्या. पुष्कळदा या विनोदाचं कारणही त्याच असतात, त्यांचीच फसवणूक झालेली असते, त्यांनीच काही तरी घोळ घातलेला असतो; पण तरीही त्याच गोष्टी आपल्या मैत्रिणींना सांगताना त्या कचरत नाहीत, एवढंच नव्हे, तर त्यावर हसायचा मोकळेपणाही त्यांच्याकडे असतो.
यावरून तिला आठवल्या गच्चीत दर शनिवारी रात्री भेटणार्या तिच्या पाच-सहा मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत अनेक वेळा हसतहसत घालवलेले दोन-अडीच तास. आठवड्यातनं एकदा भेटायचंच असं ठरवून त्या शनिवारी भेटतात आणि आठवडाभराचं हसून घेतात. कशावरूनही हसतात. शेवटी पाठ दुखू लागते हसून. मग थांबतात. दोन-तीन दिवसांनी दोघी जणी परत भेटल्या बाजारात वगैरे तर ‘किती हसलो ना परवा?’ असं म्हणत पुन्हा पाच मिनिटं हसतात. बायकांना हसायला कारण नाही लागत हेच खरं.
तुम्ही शेवटच्या कधी हसलात बरं, इतकं खळखळून? सांगणार ना आम्हाला?

कालच. मोटोरोला इ वर तोंडी आज्ञा देऊन एखादे ऍप्लिकेशन उघडता येते. थोड्या आज्ञा इंग्रजीत देऊन झाल्या नि टूम निघाली मराठी!, माहित होतं इतकं काही ते मराठीला ट्यून असणार नाही तरी काही काही बोललो नि त्यानेही त्याचे त्याच्यापरीने (काहीच्याबाही) अर्थ लावले. वंदना लटकेच म्हणाली, मराठी येत नाही, खुळचट... आमच्या मशीनने दाखवले, मेरी ख्रिसमस! :) :) :))
ReplyDelete