त्या दिवशी प्रथमच वर्सोवा ते घाटकोपर असा मेट्रोने प्रवास केला, तिथूनच प्लॅटफॉर्म उतरून डोंबिवलीसाठी मध्य रेल्वे पकडली... दोन्हीमधला फरक थोडक्यात सांगायचा झाला तर प्रेयसीला भेटून बायकोच्या सहवासात आल्यावर कसं वाटतं, तसं झालं...
वर्सोवा स्थानकात मेट्रोमधून खाली उतरले तर एकदम धूसर दिसायला लागलं. कळेना, स्वप्न पाहतेय की काय. पण नाही, दुसर्या क्षणाला लक्षात आलं की, वातानुकूलित मेट्रोमधून बाहेर प्रचंड उकाड्यात आल्याने गॉगलवर वाफ जमलीय आणि पटकन व्हॉट्स अॅपवर फिरणारा मेसेज आठवला...
वर्षानुवर्षे रोज लोकलचा प्रवास करणार्यांसाठी मेट्रोचे जग स्वप्नवत वाटावे असेच आहे. अजून तरी... गर्दी, घामाच्या धारा, अनेक पट्ट्यांमधले आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे गंध, दाराबाहेर लटकणारी हौशी पब्लिक, दागिने विकणारे फेरीवाले, भुईमुगाच्या शेंगा, संत्री, भेळ, वेफर्स इत्यादी सर्व पदार्थ खाऊन कचरा तिथेच टाकणारे आबालवृद्ध प्रवासी ही लोकलच्या प्रवासाची व्याप्ती. आणि या व्याप्तीला एक केंद्रबिंदू मिळवून देणारी त्या लोकलची विशिष्ट वेळ, उदा. सकाळची 9.14 फास्ट, वगैरे. तर यातले काही म्हणता काहीच मेट्रोमध्ये नसल्याने स्वप्नच वाटते ते.
गर्दी म्हणाल तर अगदीच नाही असे नाही, पण मेट्रोचे दरवाजे बंद होत असल्याकारणाने प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा नक्कीच आहे. अजून तरी प्रत्येक स्थानकावर डब्यांजवळ कर्मचारी तैनात केलेले आहेत, जे फलाटाच्या अगदी टोकावर उभे राहून वाकून वाकून गाडी आली की नाही, हे पाहणार्यांना मागे ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात. चढउतार सुरळीत व्हावी, यासाठीही कर्मचारी प्रयत्न करताना दिसतात. पटापट उतरा, पण धक्काबुक्की करू नका, असे सांगणार्या या कर्मचार्याने कित्येक प्रवाशांना स्कूलबसच्या प्रवासाची आठवण करून दिली असेल. एक अतिशय उमदे चित्र दिसले मंगळवारी, गर्दीच्या वेळेनंतर प्रवास करताना. वर्सोवा स्थानकावर एका चाकांच्या खुर्चीतून एका गुजराती आजींना मेट्रोचा गणवेश घातलेला कर्मचारी घेऊन आला. मेट्रो आल्यावर दोन कर्मचार्यांनी मिळून त्या आजींना हाताने गाडीत चढवले, तोवर गाडी सुरू झाली तर ते दोघे दुसर्या स्थानकावर उतरले.
पंचाहत्तरीतल्या या आजींसोबत त्यांची दोन्ही पायांनी अधू असलेली काठी घेतलेली मुलगी आणि बहुधा दोघी सुना होत्या. मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव एवढाच त्यांचा उद्देश होता. मेट्रोमध्ये डब्याची पातळी व फलाटाची पातळी यात जेमतेम दोन-तीन इंचांचा फरक असेल, जो लोकलच्या बाबतीत अनेक स्थानकांवर दीड फुटांपर्यंत आहे. यामुळे गुडघेदुखी असणार्यांनाही मेट्रोमध्ये चढणे-उतरणे सोपे जाते, किंबहुना ते उतरणे नसतेच; निव्वळ उंबरठा ओलांडून बाहेर पडणे असते. मुंबईत लोकलचा प्रवास चाकाच्या खुर्चीतून करणे जवळपास अशक्य. पाय वा हात अधू असणार्यांसाठी प्रत्येक लोकलमध्ये वेगळा डबा ठेवलेला असला तरी फलाटाच्या उंचीमुळे गाडीत चढणे हे एक दिव्यच ठरते. आणि या डब्यात इतर अनेक धडधाकट प्रवासी घुसतात, ते वेगळेच. मेट्रोचा डबा आणि फलाट यांमधले अंतरही कमाल सहा ते आठ इंच असावे, त्यामुळे त्या फटीतून कोणी खाली रुळांवर पडण्याची शक्यता नाही. अर्थात, दरवाजे बंद होत असल्याने चालत्या गाडीत शिरणे व गाडी पूर्ण थांबण्याआधीच उतरणे, हे धाडसी प्रकार मेट्रोमध्ये शक्यच नाहीत म्हणा.
वर्सोवा स्थानकात फिरताना एके ठिकाणी ती अत्यंत आश्वासक खूण दिसली... तीच, प्रसाधनगृहांची. मग जाऊन पाहणे आलेच. कारण मुंबईच्या लोकल प्रवासातला एक मोठा न बोलण्याजोगा घटक म्हणजे इथे ‘नसलेली’ प्रसाधनगृहे. प्रसाधनगृहे सर्वच स्थानकांवर आहेत नावाला; परंतु किती बायका तिथे जाऊ धजावतात, हा संशोधनाचा विषय आहे. नव्हे, अनेक वृत्तपत्रांनी यावर अनेक लेखमाला केल्याही आहेत; पण पुन्हा परिस्थिती जैसे थेच. मेट्रो स्थानकांमधली स्वच्छतागृहे अजून तरी स्वच्छ आहेत, वापरण्याजोगी आहेत, तिथे भरपूर पाणी आहे आणि सफाई कर्मचारीही आहेत. ते कितपत तसे राहील, हे सर्वस्वी मुंबईकर मेट्रो प्रवाशांच्या हातात आहे.
मेट्रोची रचना सलग आहे, त्यात चार डबे आहेत, परंतु एकमेकांना जोडलेले. चढण्या-उतरण्याकरिता 16 दरवाजे आहेत. पण बायकांसाठी वेगळा डबा नाही, बाकांवरच महिलांसाठी काही राखीव जागा आहेत. तशाच राखीव जागा विकलांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत. यात प्रथम श्रेणीही नाही, त्यामुळे वर्गीकरण नाही. सगळे प्रवासी एकाच पातळीवर असतात. सर्व वर्गातल्या पुरुष व महिलांनी एकत्र प्रवास करण्याची संधी बसमध्ये मुंबईकरांना मिळतेच; परंतु मेट्रोमध्ये कॉर्पोरेट संस्कृतीतल्या व्यक्तीही बर्याच दिसतात, ज्या बेस्टच्या बसमध्ये नसतात. ही बाबही लोकलपेक्षा पुष्कळच वेगळी. लोकलमध्ये नेहमी प्रवास करणार्यांपैकी बहुतेक प्रवाशांचे डबे, बसायच्या जागा ठरलेल्या असतात.
दोन वेगवेगळ्या स्थानकांवर भेटणारे मित्र वा मैत्रिणी मधल्या फर्स्ट क्लासला ये किंवा मागच्या लेडीजला भेटू, असे ठरवून भेटतात. मेट्रोमध्ये तसे होईलच, पण त्यासाठी मुंबईकरांना तिची आणखी थोडी सवय व्हावी लागेल. फक्त मधल्या डब्याऐवजी चौथ्या दारापाशी ये, असे सांगावे लागू शकते.
मेट्रो स्थानकांच्या परिसरात खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारी दुकाने आहेत. सध्या तरी इडलीसांबार, सँडविच आदी पदार्थ फक्त 40 रुपयांना मिळत आहेत. म्हणजे किमती अव्वाच्या सव्वा नाहीत. परंतु, प्रत्यक्ष मेट्रोच्या डब्यांमध्ये खायला वा प्यायला परवानगी नाही. तशा प्रकारची चित्रे प्रत्यक्ष स्थानकांवर नाहीत, पण खालच्या स्तरावर असलेल्या तिकीट खिडकी परिसरात आहेत. याची सवय मुंबईकर प्रवाशांना व्हायला अंमळ वेळ जावा लागेल, विशेषकरून बायकांना. अनेक जणींना गाडीत बसल्यावर सकाळचा नाष्टा करण्याची सवय असते, त्यांचे हाल होऊ शकतात.
मेट्रो वातानुकूलित असल्याने ती पूर्ण बंद आहे. पण ती पूर्णपणे बंद असल्याचा फायदा मुंबईच्या पावसात नक्की जाणवणार आहे. लोकलच्या डब्यांमधले बंद न होणारे दरवाजे व खिडक्या, गळणारी छपरे यांमुळे अनेकदा डब्याच्या आतसुद्धा छत्र्या उघडाव्या लागतात. असे अनुभव असणार्यांना मेट्रोत काचेजवळ बसून कोसळणार्या पावसाचा आनंद लुटणे शक्य होणार आहे. मेट्रोमध्ये फेरीवाले नाहीत; त्यामुळे कानातले, बांगड्या, टिकल्या, कंगवे, कीचेन्स, पर्स, गाउन, दुपट्टे, पाणी गाळण्याच्या जाळ्या, पेन, रंगवायची पुस्तके आदी खरेदी करण्याचा आनंद घेण्यासाठी लोकलकडेच वळावे लागणार आहे.
फेरीवाले नसल्यानेच बहुधा मेट्रोचा प्रवास शांततेत होतो. तसेच बायका व पुरुष एकाच ठिकाणी, जवळजवळ उभे राहून/बसून प्रवास करत असल्याने बायकांचा गप्पांचा आवाजही थोडा खालच्या पट्टीवरच राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मोबाइलवर गप्पा मारणार्यांनाही बाहेरचे आवाज नसल्याने हळू आवाजात बोलणे शक्य होणार आहे, हाही मोठा फायदाच म्हणायचा. (आजूबाजूच्यांना खासगी गप्पा ऐकाव्या लागणार नाहीत, हा त्यांचा फायदा!) मेट्रो स्थानकांचे परिसर अतिशय कलात्मक पद्धतीने सजवण्यात आले आहेत. मारियो मिरांडा या सुप्रसिद्ध चित्रकाराच्या शैलीतील प्रचंड मोठी भित्तिचित्रे असोत वा मुुंबई ज्यांच्या मेहनतीवर रोजच्या रोज चालते, धावते, जिवंत राहते त्या कष्टकर्यांची उगवत्या चित्रकारांनी रंगवलेली चित्रे; या स्थानकांवर रेंगाळणेही त्यामुळे प्रसन्न होऊन जाते. तसेच मेट्रोमध्ये कसे वागावे, याबद्दल प्रवाशांना केलेल्या सूचनाही अत्यंत मिश्कील अशा चित्ररूपात आहेत. उदा. ‘अपनी ताकत का प्रदर्शन कृपया व्यायामशाला में करे, मेट्रो के दरवाजों पे नहीं’ ही सूचना वा ‘ज्यांना कुठे थांबावं ते कळत नाही, त्यांच्यासाठी आम्ही पिवळी रेघ आखली आहे. कृपया मेट्रोची वाट पाहताना पिवळी रेघ ओलांडू नका’, या सूचनेसोबतचे दशानन रावणाचे चित्र कल्पकतेला दाद द्यायलाच लावते.
मेट्रो म्हणजे प्रेयसी तर लोकल म्हणजे बायको, असा सध्याचा जो सूर आहे. यावरून मेट्रोची देखभाल प्रवाशांकडून योग्य ती राखली जाईल, अशी आशा वाटते. कारण कोणीही माणूस प्रेयसीला बायकोपेक्षा, किंवा कोणी स्त्री प्रियकराला नवर्यापेक्षा, अधिक काळजीपूर्वक सांभाळेल ना?

Change the size of images to Medium/Large. They'd appear better.
ReplyDeleteप्रयत्न करते. परंतु मला त्याचा लेआउट नीटसा येत नाहीये करता.
ReplyDelete