इंजिनिअर शब्दाची व्याख्या खूप सोपी आहे. A person trained and skilled in the design, construction, and use of engines or machines, or in any of various branches of engineering. म्हणजे इंजिन वा यंत्राची रचना, बांधणी व उपयोग यांचा वापर करण्याचे वा इंजिनिअरिंगच्या कोणत्याही शाखेचे प्रशिक्षण घेतलेली व कौशल्य असलेली व्यक्ती. यंत्राचा वापर तर आपण सारेच करत असतो. स्त्री असो वा पुरुष. यंत्रांशिवायच्या जगाची आपण कोणीच कल्पनाही करू शकत नाही. आणि यंत्रे म्हटली की इंजििनअर आवश्यकच. कारण आपण यंत्र वापरू शकत नसलो तरी ते आपल्याला तयार करता येत नसते; परंतु १०० टक्के लोक यंत्रे वापरत असले तरी इंजिनिअरिंगचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणार्यांमध्ये मुलींचे प्रमाण अगदी चिंताजनक वाटावे, इतके कमी आहे. विशेषकरून सिव्हिल म्हणजे बांधकामविषयक, केमिकल म्हणजे रसायनविषयक आणि मेकॅनिकल म्हणजे यांत्रिकी या शाखांमध्ये अजूनही मुलींचे प्रमाण त्या शाखांमधील एकूण विद्यार्थ्यांच्या १० ते २० टक्के एवढेच आहे. मेकॅिनकलला तर ते पाच टक्केही नाही. तसंच इतरही अनेक शाखांमध्ये इंजिनिअरची पदवी घेऊनही बर्याच मुली प्रत्यक्षात त्या ज्ञानाचा उपयोग करत नाहीत.
त्या नोकरी करत असल्या तरी वेगळेच काम करत असतात, इंजिनिअर होण्यासाठी चारपाच वर्षं केलेली मेहनत मागे पडून गेलेली असते. म्हणूनच १५ सप्टेंबर रोजी भारतात साजर्या केल्या जाणार्या इंजिनिअर्स डेच्या निमित्ताने या अंकात ज्यांच्याविषयी लिहिलंय त्यांचं महत्त्व मोठं आहे. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिन. वेळेचं नियोजन, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आणि सचोटी या गुणांसाठी ते प्रसिद्ध होते. मुंबईतील सांडपाणी प्रकल्प आणि कर्नाटकात कावेरीच्या पाण्याचे नियोजन ही त्यांनी केलेल्या अनेक मोठ्या कामांमधील काही महत्त्वाची कामे.
मुलींना कोणतंही क्षेत्र वर्ज्य नाही असं आपण कितीही जोरजोरात म्हणत असलो तरी इंजिनिअरिंग हे असे क्षेत्र आहे जिथे जायला त्या घाबरतायत, मागेपुढे करतायत. का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि तिथे आवर्जून का जावं, याचंही उत्तर आवडेल. विशेषकरून ज्या महिला इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून हे उत्तर आलं तर त्याचं स्वागत आहे. कारण त्या उत्तरावरून इतर मुलींना या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहनच िमळेल,
याची खात्री वाटते. आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतोय.

Comments
Post a Comment