रात्री दहा वाजता तो मला पिकअप करायला आला. नव्याकोऱ्या बुलेटवरून. मी बुलेटबद्दल पुष्कळ ऐकलं होतं, तिच्याबद्दल बोलताना मित्रांची लाळ टपकायची बाकी असते फक्त. तिची लांबून ऐकू येणारी डगडगडग (हा आवाज कसा लिहावा, याबद्दलच्या सूचनांचे स्वागत आहे.) किती स्टेडी आहे, वगैरे वगैरे. परंतु बाइक असो किंवा मर्सिडीजसारखी ऐषोरामी गाडी, प्रत्यक्ष बसल्याशिवाय तिची गंमत कळत नाही.
बसल्यावर क्षणात गाडी सुरू झाल्यावरच त्या गमतीचा अंदाज आला. (पाय दोन बाजूंना टाकून बसले आरामात, एका बाजूला टाकून "साइड सॅडल' म्हणतात तसं नाही. त्याने गाडी चालवणाऱ्यालाही अंमळ वैतागच होताे, असा आतापर्यंतचा अनुभव होता.) गाडीने वेग वगैरे घेतला नाही, बुलेटची मजा तर स्टेडी ६०-७०च्या वेगाने जाण्यातच असते म्हणे. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूकही फार नव्हती.
दहाएक मिनिटांतच आम्ही हायवेला लागलो. तिथे त्या स्टेडी असण्याची मजा खरी कळली. गार वारा घेत, शांत, एकमेकांशी फार काही न बोलत आम्ही जात होतो. अर्ध्या एक तासाने अचानक गाडीचा आवाज बदलला. मित्र म्हणाला, "गाडी रिझर्व्हला आलीय.'
बापरे, शहरापासून इतक्या दूर आलोय. आता काय होणार, या विचाराने मी थोडी बावरले. परंतु सावरून त्याला विचारलं, "म्हणजे किती उरलंय पेट्रोल?'
"तीनसव्वातीन लिटर.'
"त्यात किती जाऊ शकते गाडी?'
"शंभर सव्वाशे किलोमीटर.'
"काय?'
"हो, शंभर सव्वाशे.'
"मग त्याला रिझर्व्ह कशाला म्हणायचं?'
"अगं, ही बुलेट आहे.' त्याच्या बोलण्यातून कौतुक ओथंबून वाहत होतं. तू कुठल्या आलतूफालतू बाइकवर बसली नाहीयेस, बुलेट आहे ही, असं तो मनात म्हणाल्याचं स्पष्ट ऐकू आलं.
अकराच्या सुमारास त्याने मला परत सोडलं. हाॅटेलच्या खोलीत परतल्यावर, झोपायची तयारी करून मी त्याला मेसेज टाइप करत होते तर त्याचाच मेसेज आला, आज बुलेट धन्य झाली.
का बरं?
मैत्रिणीला मागे बसवून फिरवून आणलं नाही तर बुलेटचा काय उपयोग?
ओह. थँकयू सो मच. आय हॅड अ ग्रेट टाइम.
अगं, माझ्या बायकोला अजिबात आवडत नाही बाइकवर बसायला. मी बुलेट घेतली तेव्हाही तिची कटकट चालूच होती, एक बाइक आहे, गाडी आहे, मग बुलेट कशाला हवीय?
आई गं!
एनीवे, बाय फाॅर नाउ, गुड नाइट.
गुड नाइट.
मग अचानक आठवला नील हार्वे. एका माहितीपटावर काम करत असताना नीलची ओळख झाली होती. साडेसहा फूट उंच, मानेवर रुळणारे केस आणि टिपिकल ब्रिटिश निळे डोळे असलेला नील छायाचित्रणकार होता त्या माहितीपटाचा. हे काम झाल्यानंतर काही महिन्यांनी अचानक त्याचं ईमेल आलं, "मी इंडियात आलोय, मुंबईत येणार आहे पुढच्या आठवड्यात. वेळ आहे का भेटायला?'
आम्ही भेटल्यावर मी विचारलं, "आता कोणत्या कामासाठी आला आहेस.'
तर म्हणतो, "कामाला नाही आलोय. मी केरळला गेलो तीन आठवड्यांपूर्वी, एक बुलेट घेतली भाड्याने आणि अख्खं केरळ पिंजून काढलं. तिथून गोव्याला गेलो. तिथे भटकलाे.' तिथून तो दिल्लीला गेला, तिथेही बुलेट भाड्याने घेऊन आसपासचा परिसर हिंडला. प्रत्येक ठिकाणी त्याला समविचारी बुलेटप्रेमी मित्र भेटतच गेले.
नंतर आठवला मुंबईत नॅनोवरच्या एका स्टोरीवर काम करताना भेटलेला सचिन. मी मुलुंडमध्ये राहते म्हटल्यावर लगेच म्हणाला, "तू मला पाहिलं असशील मुलुंडमध्ये. मी बुलेटवरून फिरतो. माझ्याकडे खूप वर्षांपासूनचं जुनं माॅडेल आहे. नंबरपण जुना तीन अक्षरं आणि चार आकडे असा.'
बाप रे, आधी बुलेट कुठली ते कळायला हवं. मग मी तिचा नंबर पाहणार. आणि नंतर ओळखणार, की हा सचिन आहे म्हणून. पण हे सगळं त्याला सांगण्यात अर्थ नव्हता. तो बुलेटच्या प्रेमात आंधळा झाला होता.
मला एरवी मोटार वा बाइक काहीच चालवायचं आकर्षण नाही. मोटार होती घरी तेव्हाही फार नाही चालवली. आता नको वाटतं. पण त्या रात्री बुलेटवर बसल्यानंतर मात्र काही मिनिटं मनात लालच निर्माण झाली होती, बुलेट घ्यावी आणि मस्त भटकावं.

Comments
Post a Comment