मुलगी सातवीत होती. आजीआजोबांसोबत बसली होती. मला एकदम म्हणाली, आमच्या ग्रूपने ठरवलंय एकदा टकिला प्यायचीय. माझ्या सासूसासऱ्यांना कळलं की नाही, मला माहीत नाही तिला नक्की काय म्हणायचंय ते. मी तिला विचारलं, ‘ती दारू आहे तुला माहितीये ना?’ ती म्हणाली, ‘अर्थात.’ म्हटलं, ‘मग ती माझ्यासोबत प्यायची, तुझ्या सगळय़ा फ्रेंड्सना घेउन ये, मी दाखवते तुम्हाला ते काय आहे.’ ती म्हणाली, ‘ओके.’ आता तिची दहावीची परीक्षा सुरू आहे, ती हा प्रश्न कदाचित विसरलीही असेल पण माझ्या अगदी ठाम लक्षात राहिला आहे.
हा प्रसंग मी माझ्या वाचक मैत्रिणींना भेटते तेव्हा हमखास सांगते कारण मला त्यावरची त्यांची प्रतिक्रिया हवी असते. बहुतेक जणींना प्रचंड धक्का वगैरे बसतो. तुम्ही असं कसं म्हणू शकता, तिला ती दारू आहे, तिचे दुष्परिणाम समजावायला हवेत, वगैरे मत जास्त करून त्या मांडतात. कालच एका सत्तरीतल्या बाईंनी तर मला धारेवरच धरलं. पण मी तिला काय उत्तर द्यायला हवं होतं ते त्या सांगू शकल्या नाहीत. असं तिला वाटताच कामा नये, असं त्यांचं मत होतं. मी म्हटलं, ‘वाटताच कामा नये ही आदर्श वस्तुस्थिती झाली. पण आज वास्तव काय आहे, त्याचा विचार केला पाहिजे की नाही?’ तर त्या म्हणाल्या, ‘कदाचित मला या वयात हे समजत नसेल.’
मलादेखील मुलीच्या प्रश्नाचा धक्का बसलाच होता परंतु तो मी दाखवला नाही. चूक की बरोबर माहीत नाही. पण हे करू नकोस म्हटलं की ते जितक्या लगेच जमेल तितकं करायचं, अशा वयात ती आता आहे हे मला माहीत आहे. ती जेव्हा असं म्हणाली तेव्हा दीपिका पडुकोनची दोनतीन गाणी खूप लोकप्रिय होती, ज्यात ती टकिला पिऊन धमाल नाचते. मला त्या गाण्यांचा हा थेट परिणाम आहे हे माहीत होतं एवढंच.
त्यापूर्वी कधीतरी जब वी मेट पाहताना शाहीद व करीनाचा एक संवाद ऐकून तिने विचारलं होतं, ‘इम्पोटंट म्हणजे काय?’ तेव्हा नवऱ्याने तिला सांगितलं, ‘समवन हू कान्ट हॅव सेक्स.’ ती ते ऐकून गप्प बसली होती. एकदा तिने सेक्सी म्हणजे काय ते विचारलं, तेव्हा मात्र मला त्याचं उत्तर नव्हतं देता आलं हे आठवतं.
गेल्या सहा महिन्यांत आम्ही दोघी मिळून ‘ग्रेज ऍनाटॉमी’ ही स्टार वर्ल्डवरची मालिका पाहात होतो. डॉक्टरांच्या जीवनावरच्या या अमेरिकी मालिकेत प्रचंड प्रमाणावर सेक्सचा उल्लेख होता, प्रत्यक्ष सेक्सही होताच. पण ती मालिका इतरही बाबींमुळे अतिशय रंजक होती. ती पाहताना मात्र मी तिला सांगितलं, ‘सेक्स असा इतका कॅज्युअली, पटकन कामाच्या वेळेत करायचा नसतो, तसा तो प्रत्यक्ष आयुष्यात तितक्या फ्रिक्वेन्सीने होत नसतो, हे लक्षात ठेव.’
तर सोळाव्या वर्षात पदार्पण केलेल्या माझ्या मुलीच्या आयुष्यात सध्या अभ्यासाला प्राधान्य असलं तरी परीक्षा संपल्यावर पुढचं शिक्षण, कॉलेज, करीअरची दिशा यावरही मोठा विचार होईल, सध्याही अधूनमधून सुरू आहेच. कधीतरी आम्ही लग्नावरून बोलतो. एकुलत्या एक मुली लग्न ठरवताना किती अटी घालतात, त्यांचे आईवडील किती इन्वॉल्व असतात त्यांच्या संसारात, असं एकदा मी तिला सांगत होते; तर म्हणाली, ‘तू पण असं करशील माझ्या वेळी, काय धमाल येईल ना?’ मी म्हटलं,‘मी काही तुझ्यासाठी मुलगा वगैरे शोधणार नाही, ते काम तुझं तू कर बाई. कोणीही चालेल.’तेव्हा पटकन म्हणाली,‘गुजराती, पंजाबी आणि यूपीवाला नक्की करणार नाही.’
तिने तीनचार वर्षांपूर्वी मला एकदा म्हटलं होतं,‘तुला जे सांगायचंय ते दोन वाक्यांत सांग, लेक्चरची गरज नाही. मला कळतं तुला काय म्हणायचंय ते.’मी त्यावर खूप विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं, की ती खरं बोलतेय.‘कपडे आवरून ठेव,’या एका वाक्यात तिला काय करायचं ते कळतं की. त्यासाठी मागच्या दोन वर्षांचा इतिहास काढायची किंवा उद्या लग्न झाल्यावर अशीच वागशील का वगैरेची काहीच गरज नसते. मग मी शिकले आणि माझी तोफ बंद केली. त्यामुळे आमची वादावादी खूप कमी झाली हे नक्की. शब्दाने शब्द वाढत जातो, याचा अनुभव आपण सर्वच घेत असतो. मग त्यातून शिकायचं का नाही?
मुलांना तुलना आवडत नाही, मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, इतरांप्रमाणे मी वागणार नाही, असं त्यांना वाटत असतं. आपल्यालाही तेच वाटत असतं ना. आणि तरीही एक आई म्हणून मी तिला कधीतरी विचारतेच, की बाकीच्या मुलांच्या आयांच्या तुलनेत मी कशी आहे. तर ती म्हणते,‘तू पुष्कळच बरी आहेस, बाकीच्या आया भयंकर आहेत. त्या मुलांचे मोबाइल तपासतात, खूप बडबड करतात, कुठे जायला देत नाहीत आणि स्वत:ही बाहेर नेत नाहीत, सारखं अभ्यासाच्या मागे लागतात, वगैरे वगैरे.’म्हणजे मी हे सगळं करत नाही, एवढं सर्टिफिकेट तरी मिळालं म्हणायचं. पुन्हा तेच, हे चूक की बरोबर ते माहीत नाही.
सध्या तिच्या मनात पुढे काय शिकायचं याबद्दल खूप संभ्रम आहे. मग त्यावर खूप चर्चा होत असतात, त्या आवश्यक आहेत. त्यांच्यासमोर खूप पर्याय आहेत, खूप काही करायचंय त्यांना, पण नक्की काय याचा निर्णय कठीण आहे. अभ्यास करताना मी तिला एवढंच सांगितलं,‘तुला समजा डॉक्टर व्हायचंय, तर सीईटी दिली पाहिजे, त्यासाठी अकरावीला सायन्सला प्रवेश घेतला पाहिजे आणि त्यासाठी दहावीत चांगले मार्क पाहिजेत. ही सिस्टिम आहे, त्याव्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही, जर डॉक्टर व्हायचं असेल तर. मग त्या दिशेने अभ्यास तरी कर, फळ काय मिळेल आपल्या हातात नसतं. आणि कुठल्याही क्षेत्रात मेहनतीला पर्याय नाही.’
त्यासाठी आम्ही दोघे तिला खूप ठिकाणी घेऊन जात असतो, मुंबईत आणि बाहेरही. वेगवेगळय़ा व्यक्ती भेटल्या की आपली जाण वाढते हे निश्चित. मोठय़ा व्यक्तींना भेटलं की त्यांच्या सहवासातून आपण काही ना काही तरी घेतोच. प्रवासाचे फायदे तर अर्थात आहेत, आणि ते मला तिच्यात दिसतात.
मी तिच्या जन्माच्या आधीपासून नोकरी करत होते, ती पाच महिन्यांची झाल्यावर पुन्हा कामावर रुजू झाले. घरी नवरा, सासू, सासरे आणि अत्यंत प्रेमळ अशी आमची मदतनीस मुलगी होते. त्यामुळे ती माझ्यावर भावनिकदृष्टय़ा अवलंबून नाही. मी ती तीन वर्षांची असल्यापासून तिला ठेवून दोन तीन दिवस बाहेर जाते, तिने एखाद्याच वेळी नको जाऊ म्हटले असेल. ती घरी योग्य आणि प्रेमाच्या, सक्षम व्यक्तींजवळ आहे या विश्वासामुळेच कदाचित मलाही कधी तिला ठेवल्याबद्दल अपराधी वाटले नाही. मीही तिच्यावर भावनिकदृष्टय़ा अवलंबून नाही, जे मी माझ्या अनेक मैत्रिणींमध्ये पाहते. मुलं एक दिवस लांब गेली तरी त्या पन्नास वेळा फोन करतात, कारण त्यांना स्वत:चं वेगळं अस्तित्वच नाहीये. एक आई आणि पत्नी म्हणूनच त्या बहुतांश वेळ जगत आहेत. मला माझ्या नवऱयाने मुलगी चारपाच वर्षांची असतानाच सांगितलं होतं, तिच्यात फार गुंतू नको, ती सोळा वर्षांची होईपर्यंत आपली, नंतर नाही. नंतर शिकायला, नोकरीला, लग्नानंतर कुठे जाईल माहीत नाही. यू हॅव अ लाइफ फॉर युअरसेल्फ, इंडिपेंडंट ऑफ हर. कदाचित माझा स्वभाव या विचाराला मिळताजुळता असेल, मी त्या वाटेने चालत राहिले. पुढचं माहीत नाही.
ती एकुलती एक. मला एक भाऊ, त्याला एक मुलगा. एकच नणंद, तिलाही एक मुलगा. म्हणजे तिचे फर्स्ट कझिन्स फक्त दोन. सेकंड कझिन्स खूप आहेत कारण माझे फर्स्ट कझिन्स खूप आहेत. त्यांचा एकमेकांशी बऱयापैकी टच असतो, भेटले की खूप धमाल करतात. पण तिच्या जवळच्या व्यक्ती असणार आहेत तिचे मित्रमैत्रिणी. हे कितीही आवडत नसलं तरी ते वास्तव आहे. त्यामुळे तिच्याशी बोलत राहून, प्रश्न विचारून तिच्या आयुष्यात काय चाललंय याचा अंदाज घेत राहणं हेच आपल्या हातात आहे. हेलिकॉप्टर मॉम होण्याचा माझा स्वभाव नाही आणि माझी आई तशी असलेली मला अजिबात आवडलं नसतं. मग मी 24 तास तिच्यावर नजर ठेवण्याचा प्रयत्न का करावा.
सेक्सविषयी आम्ही अजून थेट बोललो नसलो तरी आम्ही मैत्रिणी कधीतरी बोलतो. तेव्हा आम्ही या मतावर येऊन पोचलो की त्यांना काळजी घ्यायला सांगायची, शक्यतो शिक्षण पूर्ण होईपर्यंत किंवा मॅच्युरिटी येण्यापूर्वी शरीरसंबंध टाळायचेच. तरीही, कधी भावनेच्या आणि पॅशनच्या भरात जाऊन कोणाशी संबंध ठेवण्याची वेळ आलीच तर निरोध नक्की वापरायचा, कारण गरोदर ती राहू शकते, तो कदापि नाही. आणि जर चुकून एखाद्या वेळी असं झालं तर आयुष्यभर त्याचा बाऊ न करता, गिल्ट डोक्यावर न ठेवता ते मागे टाकून जगता आलं पाहिजे. हे आदर्श नाही, हे मला माहीत आहे. पण आजच्या मुलगे व मुलींना एकत्र येण्याची प्रचंड संधी असण्याच्या काळात मी तिला यापेक्षा वेगळं काही सांगू शकत नाही, असं वाटतं. त्याची कितीही खंत वाटली तरीही.
पुढचा भाग - http://mrinmayeeranade.blogspot.in/2014/10/blog-post_4.html

My goodness! This is deadly stuff. Super. Take a bow- Both of you rather all the three of you.
ReplyDeleteSuper. Great amount of clarity and guiding line for all the moms and dads too. Glad that someone wrote this very clearly in MARATHI!
ReplyDeletethank you Amy
ReplyDeleteछानच लिहिलंयस. हेच तर सुजाण पालकत्व आहे. तू 'हे आदर्श नाही' असं लिहितेस. आदर्श असं काही असतं का? परिवर्तन सातत्याने होत असणाऱ्या समाजात नवेच आदर्श असणार जे पुन्हा बदलतच जाणार. तू माझ्या पुढच्या पिढीतली आणि तुझी मुलगी त्याही पुढच्या. आपल्याच कल्पना घासून घ्याव्या लागणार ना. पण मस्त वाटलं.
ReplyDeleteथँक्यू अरुणाताई. कल्पना घासून घेतच तर पुढे चाललोय आपण सगळेच.
ReplyDeleteEnjoyed reading this blog!Keep writting!
ReplyDeleteThank you Sheetal.
Delete