आय लव्ह मेरिल स्ट्रीप. तिच्या
नव-याला नि माझ्या बायकोला हे माहीत आहे. आणि सर्वांचाच त्याला नाइलाज आहे -
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा.
मेरिल स्ट्रीप ही हॉलीवूडमधली अत्यंत प्रतिभावान अशी पासष्ट वर्षांची अभिनेत्री. देखणी तर ती आहेच, तिच्या अभिनयाचं तर आपण फक्त कौतुक करू शकतो, तिने रंगवलेल्या व्यक्तिरेखांमधलं वैविध्यही वाखाणण्याजोगं. (भारतीय अभिनेत्रींशी तुलनाच करायची झाली तर रेखा, शर्मिला टागोर, हेमामालिनी यांच्याशी करता येईल. किंवा वाचकांनी आपापल्या आवडत्या अभिनेत्रीचं नाव घालावं इथे.) अशा या मेरिलला ओबामांच्या हस्ते नुकताच एक जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला, तेव्हा राष्ट्राध्यक्षांनी तिच्यावरील प्रेमाची अशी जाहीर ग्वाही दिली.
हे प्रेम म्हणजे रोमँटिक प्रेम नव्हेच. हे प्रेम आहे कौतुकाचं, पसंतीचं, आपुलकीचं.
ते वाचल्यावर आणि या कार्यक्रमाची छायाचित्रं पाहिल्यावर वाटलं, आपल्या राजकीय नेत्यांनी असं एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीचं खुलेआम कौतुक केलं तर? आपली, सामान्य भारतीय नागरिकाची काय प्रतिक्रिया असेल बरं? क्षणार्धात त्याच्यावर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होईल, टीव्हीवर वाद होतील, वर्तमानपत्रांमधून लेख येतील? की आपणही या कौतुकात सामील होऊ? आपला राष्ट्रप्रमुखही आपल्यासारखाच एक माणूस आहे, त्यालाही आवडी-निवडी आहेत, असं वाटून घेऊ?
आपण प्रेम, म्हणजे प्रियकर/प्रेयसीमधलं नाही, इतर नात्यांमधलं, व्यक्त करण्यात तितकेसे खुले नाही आहोत. म्हणजे येताजाता आय लव्ह यू म्हणणं नाही. पण हातात हात घेणं, पाठीवर हात ठेवणं, एक उबदार मिठी मारणं, त्या व्यक्तीबद्दल मोकळ्या मनाने बोलणं, निर्हेतुक कौतुक करणं या गोष्टी करताना आपण अंमळ कचरतोच. सर्वसामान्य माणसाची ही तऱ्हा तर राजकीय नेते वा सेलिब्रिटीची काय सांगावी, त्यांच्या तर क्षुल्लक बोलण्याचं, करण्याचं, वागण्याचं पोस्टमॉर्टेम होतं. त्यामुळे त्यांनी हे असं मनमोकळं व्यक्त होणं, आपल्याला पटणारं नसतं. कारण त्या बोलण्याच्या, करण्याच्या, वागण्याच्या मागे काय आहे, यात आपल्याला नको इतका रस असतो. त्याचे अर्थ शोधणं अधिक महत्त्वाचं वाटतं आपल्याला. म्हणूनच आपण वैयक्तिक जीवनात इतके संकुचित असतो, की सार्वजनिक आयुष्यातही मनमोकळं वागणं-बोलणं आपल्याला रुचत नाही. पटतंय तुम्हाला?

Comments
Post a Comment