परवा, म्हणजे मे महिन्याच्या दुस-या रविवारी, जगभरात मदर्स डे साजरा केला
जाईल. आईचे आभार मानण्याचा, तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याचा, तिला आनंदी
ठेवण्याचा हा दिवस. हे निव्वळ एक पाश्चिमात्य फॅड असं आपण
म्हणू शकतो किंवा आईचे आभार कशाला मानायला हवेत, प्रेम व्यक्त करायला एक
दिवस कशाला, रोज करू शकतो, असंही. आनंदी तर तिला सतत ठेवलं पाहिजे ना,
आपल्याकडेही मातृदिन असतोच ना या भावना व्यक्त करायला, वगैरे वगैरे.
तर या निमित्ताने अमेरिकेत गाजत असलेल्या एका आईविषयी. बाल्टिमोर शहरात पोलिस कोठडीत संशयास्पदरीत्या फ्रेडी ग्रे या कृष्णवर्णीय युवकाचा मृत्यू झाल्यानंतर तिथे गेल्या काही दिवसांपासून अत्यंत स्फोटक वातावरण आहे. मोठ्या प्रमाणावर निदर्शनं होतायत आणि ती इतर शहरांमध्येही पसरलीत. या निदर्शनांच्या दरम्यान कॅमे-यात कैद झाली ही एक आई, पोलिसांच्या व्हॅनवर दगड मारणा-या आपल्या चिरंजीवांना फटके लगावत घरी घेऊन जाणारी. पोलिस प्रमुखांनी त्या दिवशीच्या त्यांच्या वार्ताहर बैठकीत तिचा उल्लेख केला आणि म्हणाले, अशा आणखी पालकांची आवश्यकता आहे आज. नंतर खुद्द व्हाइट हाउसमधून या निदर्शनांसंबंधी काढण्यात आलेल्या वार्तापत्रातही तिचा सन्मानाने उल्लेख करण्यात आला. ट्विटरवरही ती गाजली. हे वाचून आईच्या कानाचा चावा घेणा-या चोराची गोष्ट आठवली ना? चुकीची गोष्ट पहिल्यांदा घडते तेव्हाच कान उपटायला हवेत, हे तर मानसशास्त्रही सांगतं. आणि तेच बाल्टिमोरमधल्या त्या आईने केलंन. म्हणून तिचं त्या पोलिसांनीही कौतुक केलं. आपल्या मुलांना आवरा, हे पालकांना सांगायला ही आई पोलिसांना योग्य उदाहरण वाटली नसती तर नवल. कारण अशा निदर्शनांमध्ये प्रत्यक्ष संबंध नसताना हात धुऊन घेणारेही कमी नसतात.
अर्थात याला दुसराही पैलू आहे, तो म्हणजे आपण कृष्णवर्णीय आहोत, फ्रेडीसारखीच गत आपल्या मुलाचीही होऊ शकते, या भीतीतूनही तिने तिच्या मुलाला घरी आणलं असू शकतं.
कोणत्याही कारणाने म्हणा, तिने त्या गोंधळात रस्त्यावर येऊन अापल्या मुलाला फटकावलं नि घरी आणलं, हे खरं.
आई असो वा बाप, मुलांच्या चुकीवर पांघरूण न घालता तिथल्या तिथे ती चूक लक्षात आणून देणं महत्त्वाचं. आपल्या लहानपणी असं करणा-या आपल्या आईवडिलांची या निमित्ताने आठवण काढूया. चालेल ना?

Comments
Post a Comment