माणसाला वाटणारं कुतूहल दोन प्रकारचं असतं. दोन्हीत आपल्याला
जे माहीत नाही, ते जाणून घ्यायची इच्छा असते. एका प्रकारचं कुतूहल असतं
सृष्टी, निसर्गचक्र, विज्ञान, तंत्रज्ञान, आदींविषयी जाणून घ्यायचं.
दुसऱ्या प्रकारचं असतं इतर माणसांबद्दल जाणून घ्यायचं. त्यांच्या आयुष्यात
काय चाललंय ते माहीत करून घेण्याचं. या माणसांशी आपलं काहीएक देणंघेणं
नसताना वाटणारं कुतूहल. हा मानवी स्वभावाचा भाग असला तरी तो कधीकधी
सभ्यतेची मर्यादा ओलांडतो की काय, असं वाटायला लावणारे प्रसंग हल्ली
घडताहेत. एका विवाहित तरुणीचा छळ केल्याचा आरोप असलेली राधेमाँ घ्या किंवा
पोटच्या मुलीचा/बहिणीचा खून केल्याचा आरोप असलेली इंद्राणी मुखर्जी.
प्रत्यक्ष गुन्ह्याची घटना वगळून या दोघींविषयीची इतरच प्रचंड माहिती आपण
गेले कित्येक दिवस वाचतोय/ऐकतोय. आपल्यासमोर ही माहिती येतेय टीव्ही चॅनल्स
व वृत्तपत्रांमधून. आपण सगळेच ती वाचतोय, तिच्याविषयी चर्चा करतोय,
तिच्यावर विनोद करतोय, ते व्हाॅट्सअॅपवरनं फाॅरवर्डही करतोय. माध्यमांवर
टीका करणं सोपं असतं, पण आपण या माध्यमांचे ग्राहक आहोत. आपण, आपल्यापैकी
बहुतांश, ही माहिती वाचतोय, चवीने चघळतोय म्हणूनच ती आपल्यापर्यंत पोचतेय.
या दोन प्रकरणांतली मुख्य पात्रं स्त्रियांची अाहेत, यामुळे यात भरच पडली
आहे. राधेमाँ मूळ कुठली, तिचे वेगवेगळे फोटो, इंद्राणीच्या आयुष्यातील
पुरुष, विवाह, मुलं, तिची जीवनशैली यांविषयी इतकं खरंच जाणून घ्यायची
आवश्यकता आहे का? या अवांतर माहितीचा त्यांच्यावर असलेल्या आरोपाशी वा
गुन्ह्याशी काय संबंध? राधेमाँ परदेशात गेल्यावर कोणत्या गाण्यावर नृत्य
करते, याचा तिच्यावरील आरोपाशी कसा संबंध जोडायचा? इंद्राणी अतिशय
महत्त्वाकांक्षी होती, असं जेव्हा आपण म्हणताे, तेव्हा त्यात असूया तर
नाही, याचा विचार करायला हवा. एखाद्या पुरुषाबद्दल असं कधी म्हणतो का आपण
की, तो खूप महत्त्वाकांक्षी होता?
अशा वेळी हमखास तो जुन्या चित्रपटातला डायलाॅग आठवतो, ‘चिनॉय सेठ, जिन के मकान शीशे के होते हैं, वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते!’
आपण तर राहत नाही ‘शीशे के घर में’?
अशा वेळी हमखास तो जुन्या चित्रपटातला डायलाॅग आठवतो, ‘चिनॉय सेठ, जिन के मकान शीशे के होते हैं, वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते!’
आपण तर राहत नाही ‘शीशे के घर में’?
Correct...माध्यमं TRP
ReplyDeleteसाठी वाट्टेल ते करताहेत...
पण वाचणारे/पाहणारे आपणच आहोत ना?
ReplyDeleteटिका थांबवण्यासाठी माध्यमांनी काही खबरदारी घ्यायला नको का ?
ReplyDelete