युरोपात असलेल्या सुनेच्या बाळंतपणाला जायला नकार देणाऱ्या पुण्यातल्या एका जोडप्याचा लेख नुकताच एका वेबसाइटवर प्रसिद्ध झाला होता. त्या निमित्ताने परदेशस्थ मुलामुलींच्या भारतस्थित आईवडिलांची काही निरीक्षणं.
ट्रेनमध्ये एक बाई तिच्या मैत्रिणीला अमेरिकास्थित मुलीची गोष्ट सांगत होती. मुलगी चांगली शिकून तिथे गेली होती, तिघी मिळून एका फ्लॅटवर राहात होत्या. आईवडील यंदाच महिनाभर राहून आले होते. "तिथे सगळं इतकं महाग बापरे. दूध अमुक डाॅलर, हाॅटेलमध्ये एक दिवस राहिलो तर इतके डाॅलर, भाडंच जवळपास एक लाख रुपये होतं...' वगैरे वगैरे.
या गप्पा एेकणाऱ्या बाईने विचारलंनच, "पगार डाॅलरमध्ये मिळतोच ना तिला?'
त्यातली खोच लक्षात येण्याजोगी त्या आईची मनोवस्था वाटली नाही.
अशा अनेक आया न बाप आपल्याला भेटत असतात. तिकडे असं नि तिकडे तसं, कौतुकाचा धबधबाच जणू.
मात्र, गेल्या काही वर्षांत या कौतुकाची जागा कंटाळ्याने, थकव्याने घेतलीय, असं लक्षात येतंय.
कंटाळा सुनेच्या वा मुलीच्या बाळंतपणासाठी अमेरिका व युरोपात सहा महिने जाऊन राहण्याचा.
कंटाळा वीकेंड वगळता पाच दिवस घरात बसावं लागण्याचा.
कंटाळा कुठेही जायचं तरी कोणावर तरी वाहनासाठी अवलंबून असण्याचा.
कंटाळा अाजूबाजूला कोणीही बोलायला/गप्पा मारायला नसण्याचा.
कंटाळा घरातली सगळी कामं नोकरासारखी करावी लागण्याचा.
कंटाळा भारतातलं स्थिर, परिचयाचं, आपलं जग सोडून राहण्याचा.
कंटाळा अति थंडीमुळे घरात कोंडून घेण्याचा.
आपल्या प्रत्येकाच्या घरात, सख्ख्या कुटुंबात किमान एक तर मुलगा वा मुलगी अशी आहे जो/जी शिक्षण/नोकरी/विवाह यांमुळे भारत सोडून इतर देशात काही काळासाठी वा कायमची वास्तव्याला आहे. अमेरिका, युरोप, आॅस्ट्रेलिया व आखाती देशांमध्ये अशा भारतीयांचं प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी सुरुवातीला मुला/मुलीच्या ग्रॅज्युएशन सेरिमनीसाठी अनेक पालक जातात. बऱ्याचदा मुलांना लगेच तिथे नोकरी मिळालेली असते. चांगला पगार असेल, राहायची सोय असेल तर पालक देश भटकायला म्हणूनही जातात. त्या वेळी खूप फिरतात, तिकडच्या संस्कृतीशी परिचय करून घेतात. आवडीनुसार वाचनालयाचा वापर करायला शिकतात, वाॅकला जातात, ओळखीपाळखी करून घेतात. आणि तरीही तिथे सहा महिने काढायचा कंटाळा येऊ शकतो. माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा न्यूयाॅर्कमध्ये आहे. ते काका तिथे गेले की खूप वाचत, भटकत. तरीही एकदा म्हणालेच, काय मागच्या जन्मी पाप केलं म्हणून मुलगा अमेरिकेत स्थायिक झालाय. ही टोकाची प्रतिक्रिया वाटू शकते, परंतु प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांना ती पटावी.
तिसरी वेळ आलीच जायची तर ती बह्वंशी लेकीच्या वा सुनेच्या बाळंतपणासाठी येते. पूर्वी असं जाण्यातही कौतुकाचा, काळजीचा, प्रेमाचा मोठा भाग होता. तिथे कसं दोन दिवसांत घरी सोडतात, घरी कोणीच नसतं मदतीला, सगळी कामं आपली आपण करावी लागतात, बाळंतिणीला जपायला हवं ४० दिवस, वगैरे वगैरे.
आता हा सूर बदलला आहे. तो बदलायला शेकडो आई/सासूंचे अनुभव कारणीभूत झाले असावेत.
बाळंतपण काही सांगून सवरून, आपल्या सोयीच्या तारखांना येत नाही. अगदी प्लॅनिंग करून मूल जन्माला येत असेल तरीही. आणि सोय पाहिली जात असेलच, तर ती जन्मदात्या आईबापांची, होऊ घातलेल्या आजीआजोबांची नक्कीच नाही. अमेरिका व युरोपातला हिवाळा अगदी कडक. उत्तर भारतात बऱ्यापैकी थंडी असतेही, पण बर्फाचे वेगवेगळे प्रकार नसतात. त्यामुळे ऐन हिवाळ्यात अमेरिका वा कॅनडात जाणं ही साठी ओलांडलेल्या पालकांसाठी मोठी शारीरिक शिक्षाच असते. हिवाळा नसेल तरीही तिथे बहुतांश भागात आपल्यापेक्षा तापमान कमीच असतं. त्यात घरी कामात मदत करायला कोणी नसतं, भारतात बहुधा असं कोणीतरी असायची सवय असते. बाळंतिणीची काळजी आपल्या भारतीय परंपरांनुसार घ्यायची इच्छा असते. बाळालाही कसं वागवावं, गुटी, दुपटी, टोपरी इत्यादि इत्यादि इकडच्या सारखं करायचं असतं. एकटीच्या जिवावर ते जमत नाही. तिकडच्या पद्धतीनुसार सून/मुलगी तीन महिन्यांत कामावर जाऊ लागते, बाळाला एकहाती सांभाळायचं. पुन्हा काही होणार तर नाही, सून/मुलगी काही म्हणणार तर नाहीत, याची टांगती तलवार असतेच डोक्यावर. साधारण साठी आलेली असते स्वत:चीही, प्रकृतीच्या कुरबुरी असतातच. वैद्यकीय खर्च नको वाटतो. प्रत्येक वस्तूची/सेवेची किंमत रुपयांत मोजण्याची सवय असते. डेंटिस्ट किंवा पार्लरमध्ये इकडेच काम पूर्ण करून घेतात अनेक जण त्यामुळे.
ज्या मुलामुलींना आईवडिलांना वीकेंडला तरी फिरवून आणणं शक्य असतं, परवडतं त्यांच्या पालकांचं एकवेळ ठीक आहे. वीकेंडला आसपासचा परिसर पाहता येतो. परंतु, ज्यांना हे शक्य नाही, असेही लोक आहेतच की, त्यांच्यासाठी तिथला काळ तुरुंगवासापेक्षा कमी नसतो. वीकेंड म्हणजे फक्त जवळच्या माॅलमध्ये जाऊन आठवड्याची खरेदी एवढंच गणित बाकी उरतं.
ज्या बातमीचा सुरुवातीला उल्लेख केलाय त्यातलं जोडपं आहे पुण्यातलं. दोन मुलगे. एक अमेरिकेत, एक युरोपात. अमेरिकेतल्या सुनेचं बाळंतपण करून पुण्यात येऊन काही महिने लोटतात तोच युरोपातल्या मुलाचं बोलावणं येतं, त्याच्या बायकोच्या बाळंतपणासाठी. वडील स्पष्टपणे नाराजी व्यक्त करतात, इथलं घर सोडून राहायला नको वाटत असतं त्यांना. आईला एकीकडे नवऱ्याची बाजू समजत असते, तिचीही काही अंशी तीच बाजू असते. पण येणाऱ्या नातवंडासाठी थोडं सहन करायला काय हरकत आहे, असंही वाटत असतं. पण विचारांती दोघंही युरोपला जायला नकार देतात. हे कळल्यावर अर्थात मुलगा चिडतो, तुम्ही त्याच्याकडे गेलात, माझ्याकडे का नाही, असा त्रागा करतो. नातलग, शेजारीपाजारी काहीबाही बोलतात.
पण हे दोघं निर्णयावर ठाम राहतात.
या बातमीने भारतातल्या अनेक जोडप्यांना नाही म्हणायचं बळ मिळालं असेल, असं वाटतं. कारण त्यांनाही हे सगळं खुपतच असतं. पण पोटच्या मुला/मुलीला नाही कसं म्हणायचं, याची भीड एवढी जबरदस्त असते की, ती स्वत:च्या तक्रारींना मागे टाकते.
शिवाय, आता असंही वाटू लागलेलं असतं की, तिथे राहतात, एरवी जीवनशैली तिथली आहे, मग बाळंतपणच भारतीय परंपरेने कशाला हवं. तुमच्या तिकडच्या मैत्रिणींच्या आया/सासवा तर येत नाहीत ना सहा सहा महिने राहायला, त्या आणि नवरा असंच सांभाळतात ना बाळाला. घी देखा तो बडगा भी देखो, असाही मुद्दा यात आहे, आणि तो तरुण पिढीने विचारात घ्यायलाच हवा.
आखाती देशांमध्ये असं सहा सहा महिने जाणाऱ्या पालकांचं प्रमाण फार नाही, तिकडे असलेल्या लेकीसुना बाळंतपणासाठी भारतातच येतात बहुतेक.कारण तिथे जन्मलेल्या मुलाला काही अमेरिकेसारखं अत्यंत मौल्यवान ग्रीन कार्ड नसतं मिळणार. आणि अाखाती देश आहेतही अडीच तीन तासांच्या अंतरावर. खेरीज तिथे भारतीयांचं प्रमाणही मोठं.
आईवडिलांना असं वाटत नाही, अशी मुलंही अाहेतच अर्थात. जी हक्काने त्यांना आपल्याकडे नेतात, भरपूर प्रवास करतात. आजीआजोबा आणि नातवंडांमध्ये एक छान बंध जुळून येताे.
परंतु, परदेशात मुलं आहेत, म्हणजे सगळंच हिरवंगार, गोडगोड आहे असं नव्हे, तिथेही जाऊ नयेसं वाटू शकतं, तसं वाटलं तर त्यात अनैसर्गिक काही नाही, हे स्वीकारायला सुरुवात झाली आहे असं नक्की वाटतंय.

Comments
Post a Comment