स्नेप. आॅलवेज.

अॅलन रिकमन या ब्रिटिश अभिनेत्याचं वयाच्या ६९व्या वर्षी कर्करोगाने काल निधन झालं. त्यांचे अनेक चित्रपट, खरंतर व्यक्तिरेखा, गाजलेले आहेत परंतु नव्या पिढीसाठी ते होते प्रोफेसर सेवरस स्नेप. जेके रोलिंग लिखित हॅरी पाॅटर व त्याच्या गोष्टींमधले एक खलनायक. सातही चित्रपटांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. हॅरीच्या जिवावर उठलेला, काळ्या जादूचा अनभिषिक्त सम्राट वाॅल्डमाॅर्टचा स्नेप हा जवळपास उजवा हात, विश्वासू साथीदार. हाॅगवार्ट स्कूल आॅफ मॅजिक अँड विझार्डरीमध्ये पोशन्स म्हणजे रसायनशास्त्राचा प्राध्यापक. मानेवर रुळणारे काळेभोर सरळ केस आणि काळा रोब हे रूप सातही चित्रपटांमध्ये कायम आहे. इंग्रजीत severe म्हणजे कठोर. severus हे नाव यातूनच आलेलं. हॅरीची आई लिलीवर स्नेपचं प्रेम असतं, परंतु ती जेम्स पाॅटरच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करते, हा एवढाच हळवा कोपरा स्पष्ट समोर येणारा.
हॅरी पाॅटर मालिकेतलं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं १९९७मध्ये. पहिला चित्रपट आला २००१मध्ये. त्यानंतर आजतागायत हॅरी पाॅटरचं गारूड अनेकांवर कायम आहे. माझ्या मुलीचा जन्म १९९७मधला, म्हणजे ती पाॅटर जनरेेशनची एक अट्टल प्रतिनिधी. अट्टल एवढ्यासाठी की सगळी पुस्तकं, पहिली काही सोडता बाकीची ६०० वगैरे पानांचे ग्रंथराज आहेत, अनेकवेळा वाचलेली, सगळे चित्रपट अनेक वेळा पाहिलेली ही पिढी. फेसबुक आणि इंटरनेटवरच्या अनेक वेबसाइट्समुळे हॅरी पाॅटरविषयक इतर प्रचंड साहित्य या पिढीने वाचलेलं असतं. हॅरी पाॅटरविषयी प्रश्नमंजुषा होतात, आॅनलाइनही होत असतात. त्यात हॅरीच्या जन्मतारखेपासून विविध मंत्र, हाॅगवार्टसची रचना वगैरे वाट्टेल ते प्रश्न विचारलेले असतात. फेसबुकवर अशी अनेक पेजेस आहेत, ज्यांवर दररोज मीम्स, फोटो, इंटरेस्टिंग फॅक्ट्स, असं काहीबाही प्रसिद्ध होत असतं. ही पिढी ते भक्तिभावाने वाचत, शेअरत असते.
काल रिकमन यांचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर या पिढीने ज्या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली ती अचंबित करणारी होती. विचारातही पाडणारी होती. आपल्या आवडत्या चित्रपट मालिकेतील एक व्यक्तिरेखा, तीही खलनायकाची, रंगवणाऱ्या जवळपास सत्तरीतल्या अभिनेत्याचा मृत्यू या पिढीला इतका हलवून सोडतो, की ते आज मोर्निंगचे काळे कपडे घालायचं ठरवतात. घरातल्या भिंतीवर स्नेपचे काही संवाद लिहितात. उद्या माझा नेमका केमिस्ट्रीचा पेपर आहे, आणि आज ते गेले, हा किती वाईट योगायोग आहे, असं वाटतं त्यांना. मी माझं दु:ख कसं व्यक्त करू, असं वाटतं. कोणी ब्लाॅग लिहितं त्याच्याविषयी. त्यांचं फेसबुक न्यूजफीड रिकमनने भरून गेलंय.
आजच्या घडीला वय वर्षं १० ते २५ या वयोगटातील शेकडो मुलामुलींना हे दु:ख झालंय. त्यांना त्यांच्या आयुष्यातलं कोणीतरी गेल्यासारखं वाटतंय. स्नेप काही प्रेमळ वगैरे व्यक्ती नव्हता. त्याने सातही चित्रपट मिळून एकदाही, मोजून एकदाही, स्मितहास्यदेखील केलेलं नाही. तो आक्रस्ताळे हावभाव करत नाही, आवाज चढवत नाही, राग आला तर किंवा द्वेष दाखवायचा तर चेहरा वाकडातिकडा करत नाही. अत्यंत थंड नजरेतून, आणि एका संथ खालच्या पट्टीतल्या आवाजात बोलतो. तेही फार कमी. त्याला लांबलचक संवादही नाहीत. (अॅलिस इन वंडरलँड या डिस्नेच्या अफलातून चित्रपटात अॅब्सोलेम द कॅटरपिलर या तत्त्वज्ञ/भविष्यवेत्ता व्यक्तिरेखेला रिकमन यांनी आवाज दिला आहे.) शेवटच्या भागात तर त्यांनी हाॅगवार्ट्सचे प्रेमळ, हसरे, लाडके प्राचार्य अाल्बस डम्बलडोर यांना ठार मारलंय. मग त्याच्या जाण्याचं एवढं दु:ख का? (रिकमन वैयक्तिक आयुष्यात अतिशय हसतमुख, बोलके, प्रेमळ होते.)
दुसरा असा विचार मनात येतो की, (तो कदाचित अस्थानी असेल) असं दु:ख या पिढीला एखाद्या भारतीय कलाकाराच्या, अभिनेत्याच्या, संगीतकाराच्या, गायकाच्या निधनाने, वाटेल का? असा एखादा भारतीय कलाकार आहे का, ज्याच्याविषयी प्रश्नमंजुषा आयोजिल्या जातात? ज्याच्यावर ही पिढी निस्संकोच प्रेम करते? ज्याच्याविषयी इतकं भरभरून बोलते, लिहिते, व्यक्त होते?

Comments

  1. First of all Atya, Solid Bog as always. Here are a few of my thoughts about the subject. Let me know what you think.

    You know it's funny, yesterday was the death of Alan Rickman, however the world is mourning Prof Snape. I think there are two reasons for that
    1. Snape as a character was beloved by the Harry Potter generation and older fans alike because of him being revealed as the Anti-Hero but still a Hero at the end.
    2. Alan Rickman I think was the only actor who was able to present a character as portrayed in the books. No one else got as close to the "book-character-feel" as Rickman did.
    He truly was great. He made Snape come alive.

    Which is why it saddens me write the next few words. Why remember Rickman only for Snape. Rickman was famous way before that. Hell, he was famous as a villain even before Harry Potter was written!

    Why isn't anything being said about Rickman's portrayal of Hans Gruber, The cold calculating Villain of the first Die Hard Film. He actually made the career of Bruce Willis! (Please note I am a huge Die Hard Fan).
    Why forget the Evil Sheriff of Nottingham (Played by Rickman) for which he won a BAFTA
    And most sadly, why have people forgotten Rickman's portrayal of Rasputin! I mean he was superb in that and it earned him a Golden Globe, an Emmy and an Actors Guild award.

    Alan Rickman was a giant in modern film history. His legend status of the business was already secure even before Snape came along. So I feel a little sad that a Giant like Rickman is remembered for only one role. I can understand younger audience and HP fans only thinking of Snape. But why was the media so narrow minded. Even the headlines read "Death of Actor who played Snape"!! Surprising!!

    About the last part of your blog where if the younger audience would react in the same way for an Indian Artist:
    Maybe the reason today's THINKING young generation might not react in the similar manner for any indian film actor is maybe due to the steady decline of creativity in Bollywood films since 90's. I mean we have been mooching off the Hollywood movies. Originality is very minimal.
    However I will list down a few names whose death, I think, will create a great stir.

    1. Amitabh Bachchan
    2. Shankar Mahadevan
    3. AR Rahman
    4. SRK (As much as I hate to admit it, he has become an Icon)
    5. Sachin Tendulkar (I consider him an Artist and this may be a National Holiday)

    The death of our Beloved APJ has proved our thinking and smart young generation can recognise a True Hero and laud his praises. I believe in it.

    Please let me know what you think

    *The above are my own unfiltered views. So anyone, please don't be offended

    ReplyDelete
  2. it was the indian media which portrayed Rickman only from the HP point of view. world over, he was Sir Alan Rickman and he was written about like that. we indians do have a narrow view of so many things.
    about your list of people, i agree.

    ReplyDelete

Post a Comment