ती तुझ्यामाझ्यासारखीच आहे. संसार, मुलं, नवरा, स्वयंपाक, फॅशन, मित्रमैत्रिणी, नातलग, काॅलेज, नोकरी, इत्यादि इत्यादि. तिची नि आपली स्वप्नंही सारखीच. शांततेत जगावं, मुलाबाळांनी शिकावं, आपणही शिकावं, नोकरी/काम करून स्वावलंबी व्हावं, जमेल तसं भटकावं, इत्यादि इत्यादि. फरक एवढाच की, ती कधीकधी बुरख्याआड असते. हा बुरखा कधी काळा तर कधी रंगबिरंगी, कधी साधा तर कधी डिझायनर. कधी वर्क केलेला तर कधी भरतकाम केलेला. पण त्याच्या आत ती तुझ्यामाझ्यासारखी साडी किंवा सलवार कुडताच नेसलेली असते. तिनेही मॅचिंग कानातलं, बांगड्या, हेअरबँड, क्लच लावलेला असतो. पण ती वेगळी वाटते, तिच्या काळ्या बुरख्यामुळे. (घूँघट किंवा पडदा तर इतर धर्मांमध्येही आहेच की.) आपल्या सगळ्यांच्याच बुरख्याआड जगणाऱ्या मैत्रिणी असतातच लहानपणापासून.
पण तरीही मुस्लिम स्त्रियांचं भावविश्व, त्यांच्या आयुष्यावरचा धर्माचा तथाकथित पगडा, पुरुषसत्ताक पद्धती आणि या सगळ्याचं प्रतीक असलेला बुरखा यांविषयी आपल्याला फार खोलात जाऊन काही माहिती नसते. ते थोडंफार ध्यानी यावं यासाठी आजच्या अंकात बुरख्याच्या आड दडलेल्या आपल्या मुस्लिम मैत्रिणींविषयी लेख प्रसिद्ध करतोय. सामाजिक, आर्थिक, कौटुंबीक पातळीवर काय आहेत तिच्यासमोरची आव्हानं आणि ती कशी सामोरी जातेय त्यांना, हे या लेखांमधून वाचायला मिळेल. आणि हेही ध्यानात येईल की, तिच्यासमोरची आव्हानं, तिच्यावरची बंधनं फक्त धर्माने तिच्यासमोर उभी केलेली नाहीत, ती प्रामुख्याने पुरुषप्रधान समाजाने, संस्कृतीने उभी केलेली आहेत. आणि ती ही बंधनं काढून टाकण्यासाठी हळुहळू का होईना, पण नेटाने प्रयत्न करतेय. ती शिकतेय, नोकरी करतेय, स्वावलंबी होऊ पाहातेय. तिला अर्थातच तिच्या घरातल्या पुरुषांची यात साथ आहे.
शनिमंदिरातील प्रवेशाबाबत बोलताना प्रागतिक विचार सांगतो की, तात्त्विक मुद्दा म्हणून प्रवेशावर बंदी नको हे योग्यच, पण त्याने बाकीचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीयेत. अगदी तेच हाजी अलीतील प्रवेशालाही लागू होतं. इतकंच सांगावंसं वाटतं की, "त्या' आणि "आपण' असं काही नाहीये, "आपण'च आहोत सगळ्याजणी, एकमेकींसोबत. आहोत ना?

Comments
Post a Comment