मुल'गी' असं करणार नि मुल'गा' तसं करणार, याचे काही ठोकताळे आपल्या डोक्यात फिट्ट बसलेले असतात. आपल्या म्हणजे फक्त भारतीयांच्याच नाही. जगभरातल्या प्रत्येक समाजात, संस्कृतीत स्त्री व पुरुषांकडे पाहण्याचे वेगळे, नुसते वेगळेच नव्हे तर भेदभाव करणारे, दृष्टिकोन आहेत. कमीजास्त प्रमाणात का होईना, पण हा भेदभाव सगळीकडे आहे. परंतु तो सगळीकडे आहे म्हणजे बरोबरच आहे असं नाही. जिथे सुशिक्षित समाज जास्त तिथे हा भेदभाव कमी दिसून येतो, कारण स्त्रिया आणि पुरुष काही शारीरिक वेगळेपणा वगळता सारखेच, समान असतात, हे मत तिथे रूढ होऊ लागलं आहे. अर्थात तेही सरसकट म्हणता येणार नाही, कारण अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशात, यंदा होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, उमेदवारी मिळण्याची अधिकाधिक शक्यता असलेले डोनाल्ड ट्रम्पसारखे पुरुष स्त्रियांच्या विरोधात, पुरुषप्रधान संस्कृती जपणारी वक्तव्यं सर्रास करत आहेत.
आपले हे ठोकताळे लहानपणापासून आपण जे काही ऐकतो, पाहतो, अनुभवतो त्यानुसार विकसित होत जातात. आई हेच करते, ते करूच शकत नाही आणि बाबा हेच करतो, ते करूच शकत नाही, हे याचंच एक उदाहरण. प्रत्यक्षात बाळाला जन्म देणं आणि स्तनपान या दोन गोष्टी सोडल्या तर पुरुष काही करू शकत नाही असं नाही, घराच्या बाबतीत बोलायचं झालं तर. तसंच स्त्रियाही करू शकत नाहीत, असं फारसं काही शाबित करायचं राहिलेलं नाही आता, घराबाहेरचं बोलायचं झालं तर.
या समज/गैरसमजांना खतपाणी घालत असतं साहित्य, चित्रपट, नाटकं, कला, आदि. म्हणूनच प्रागतिक व मागासलेल्या विचारांचे असे दोन गट या सर्व कलाप्रकारांत पाडता येतात. नुकताच प्रसिद्ध झालेला "की अँड का' हा गृहिणीपदाचं महत्त्व अधोरेखित करणारा चित्रपट या दृष्टीने पाहण्याजोगा. तो गृहिणी किती महत्त्वाची भूमिका निभावते, तसंच तिला किती मानहानी सहन करावी लागते, ते दाखवतो.
तुम्हा वाचकांपैकी ज्या गृहिणी आहेत, किंवा ज्यांच्या अाई/पत्नी/मुलगी/बहीण गृहिणी आहेत, त्यांना यातून काही घेण्यासारखं असण्याची शक्यता वाटते. आजच्या अंकातले आणखी काही लेखही गृहिणींना सन्मान देण्याबाबतचेच आहेत, तेही या संदर्भात वाचण्याजोगे व विचार करण्याजोगे आहेत.
घरसंसार उत्तम रीतीने सांभाळून इतर सदस्यांना बाहेर मुक्तपणे उडण्याचं सुख मिळवून देणाऱ्या समस्त गृहिणींना हा अंक सादर.

Comments
Post a Comment