पाॅप्युलेशन फर्स्ट या लिंगसमभावावर काम करणाऱ्या संस्थेचं लाडली हे मुलींविषयीचं कॅम्पेन. ही लाडली ११ वर्षांची झाली, त्याचं सेलिब्रेशन करायला महालक्ष्मीच्या एस्सार हाउसमध्ये नऊ जूनच्या संध्याकाळी चित्रपटक्षेत्रातल्या, परंतु अभिनेत्री नाहीत, अशा पाच तरुणींच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. गँग्स आॅफ वासेपूरची निर्माती गुनीत मोंगा, विकी डोनरची पटकथाकार जुही चतुर्वेदी, राॅक आॅन आणि काय पो छेची पटकथाकार पुबाली चौधरी, NH10 ची संकलक जबीन मर्चंट आणि निल बट्टे सन्नाटाची दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी या त्या पाच जणी. निल बट्टेची नायिका स्वरा भास्कर अगदी समारोपाच्या सुमारास गप्पांमध्ये सामील झाली. या सगळ्यांना बोलतं केलं डाॅली ठाकूर यांनी. डाॅली चित्रपटांशी संबंधित आहेतच, परंतु पाॅप्युलेशन फर्स्टशीही त्यांचा अगदी सुरुवातीपासूनचा संबंध आहे.
पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलेल्या वा करू पाहणाऱ्या या पाचजणी. महिला दिग्दर्शक आहेत, पण बोटावर मोजण्याजोग्या. संकलक, निर्माती आणि पटकथाकार तर फारच कमी. Am I being just one of the boys? Or am I bringing something different to the film? हा या सगळ्यांनाचा सतावणारा प्रश्न. मी स्त्री आहे म्हणून मी काय वेगळं करू शकते, हे आव्हान या साऱ्यांपुढे कायमचंच.
गुनीत मोंगा ही गँग्स आॅफ वासेपूर आणि लंचबाॅक्सची निर्माती. अनुराग कश्यपच्या कंपनीची ती सीईओ. दिल्लीत मोठी झालेली एक पंजाबी मुलगी. तिने अगदी लहान वयात या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एकुलती एक होती, घरी लाड खूप झाले, पण लग्नायोग्य होण्याचं प्रेशरही होतं. भरतनाट्यम शिकायला लागली तर वडील म्हणाले, हम लडकेवालों से क्या कहेंगे, कि लडकी नाचती है? तैक्वांदो शिकू लागली, तर ते म्हणाले, अब क्या कहेंगे, लडकी मारपीट करती है? ड्रम वाजवायला शिकली तर म्हणाले, अब क्या कहेंगे, बँड बजाती है? पण चित्रपटांसाठी पैसा उभा करणं हेच तिच्या आवडीचं होतं, तिने प्राॅडक्शनमधलं शिक्षणही घेतलंय. एकदा तिच्या चित्रपटाचा दिग्दर्शक त्यांच्या घरी जेवायला आला तर वडील त्याला, गुनीत कशी चांगली अभिनेत्री आहे ते सांगू लागले. म्हणजे त्यांच्या लेखी तिचं काम अजूनही लक्षणीय नव्हतंच. ती २४ वर्षांची असताना आईवडील अगदी थोड्या काळाच्या अंतराने गेले. ती मुंबईत स्थायिक झाली. एवढ्या लहान व्यक्तीशी, तेही मुलीशी, पैशाची चर्चा करणं, हेच इथल्या ढुढ्ढाचार्यांच्या पचनी पडणारं नव्हतं. तिला लोक विचारत, मॅम, प्रोड्यूसर कहाँ है?
पुबाली, राॅक आॅन आणि काय पो छे या चित्रपटांची पटकथाकार. टिपिकल तेजस्वी बंगाली मुलगी, त्यात जादवपूर विद्यापीठ आणि पुण्यातल्या एफटीआयआयची विद्यार्थिनी. तिच्याच शब्दांत Wannabe intellectual, म्हणजे होतकरू बुद्धिवादी. मग चेतन भगतसारख्या तद्दन गल्लाभरू लेखकाच्या पुस्तकावर आधारित पटकथा लिहायची, हे तिला मोठं आव्हान वाटावं यात नवल नाही. तब्बल १८ मसुद्यांनंतर तिची पटकथा स्वीकारली गेली. हा खूपच मोठा धडा होता तिच्यासाठी.
जबीन, संकलक. मेट्रो गोल्डविन मेयर या प्रख्यात हाॅलिवूडच्या चित्रपट निर्मिती कंपनीत मार्गरेट बूथ ही चित्रपट संकलक होती. तिच्यासाठी चित्रपट संकलक Film editor हे पद निर्माण करण्यात आले, तोवर संकलकाला Cutter म्हटले जाई, असं तिने सांगितलं. महिला संकलक म्हणून दिग्दर्शकाशी कधी मतभेद झाले का, या प्रश्नावर तिने एका प्रदर्शित होऊ न शकलेल्या चित्रपटाचं उदाहरण दिलं. नायिका पोहतानाचा शाॅट होता. तो जबीनने संकलित केला. परंतु त्या दिग्दर्शकाने तो बदलला आणि त्या दृश्याचा अर्थच बदलून टाकला. चित्रपट प्रदर्शित न झाल्याचा तिला आनंदच वाटला. रात्री उशिरापर्यंत काम करण्याचा वगैरे त्रास तिला वाटत नाही, मुंबईत राहात असल्याचा फायदा, असं ती म्हणाली.
अश्विनी मूळची जाहिरात क्षेत्रातली. निल बट्टे तिचा पहिलाच चित्रपट. कौन बनेगा करोडपतीसाठी मुलींविषयी एका जाहिरातीच्या शूटसाठी हरियाणात गेली होती. तिथल्या मुखियाने लडकी हुई तो क्या, मुबारक क्यों असं विचारलं आणि ती विचारात पडली. केबीसीची हीच ती जाहिरात तेव्हाच तिच्या डोक्यात या विषयावर चित्रपट करायचा किडा शिरला. नंतर कधीतरी तिच्या पतीने तिला म्हटलं, आई नि मुलगी एकत्र शाळेत जातात, यावर चित्रपट काढ. त्यावर बरंच काम करून निल बट्टे तयार झाला. त्याचं बरंचसं चित्रीकरण आग्य्रात झालंय. तिथल्या लोकांना बायांना असं पाहण्याची, त्यांच्या सोबत काम करण्याची सवयच नाही. बाॅस म्हणून तर अजिबातच नाही. मग सुरुवातीला तिला सगळे सर म्हणत. बोलायचं असेल तर नुसतं तिच्या समाेर किंवा मागे उभं राहात. आता शेकडो माणसं ज्या सेटवर आहेत तिथे दिग्दर्शक न चिडता शांतपणे काम करणं अशक्यच. मग अशा वेळी तर एका बाईचा ओरडा खाणं त्यांना सहनच होत नसे. पुरुष दिग्दर्शक असता तर त्याच्या शिव्या यांनी सहज पचवल्या असत्या आणि संध्याकाळी त्याच्याच सोबत दारूही प्याली असती.
असाच अनुभव जूहीचासुद्धा. सिगारेट शेअर करत वा बारमध्ये बसून दारू पीत "आयडिया क्रिएट करते हैं' हे तिला करायचं नव्हतं. विकी डोनरसारखा स्पर्म डोनर या संवेदनशील विषयावरचा चित्रपट तिने लिहिला होता. त्याविषयी तिच्याशी चर्चा करणं, पुरुषांसाठी जवळपास अशक्य होतं. कारण त्यांना तिला नक्की काय म्हणायचंय, किंवा ती यापुढे काय म्हणेल याचा अंदाज नव्हता येत. मग अनेकदा तर त्यांनी स्पर्म डोनरऐवजी किडनी डोनर हा विषय असल्याचं सांगितलं.
पुबाली म्हणाली, मी सिगरेट ओढते, शिव्याही देते, पण त्याचा काही उपयोग होत नाही.
जूही लखनऊची. बारावीनंतर तिला BFA करायचं होतं, पण वडील म्हणालं, बीएफए म्हणजे काय ते कोणालाच माहीत नसतं, तुझं लग्न कसं होणार? तू BAकर. ती बधत नाही म्हटल्यावर त्यांनी सांगितलं, मी फीचे पैसे देणार नाही. बीएफएच्या प्रवेशपरीक्षेत जूही पहिली आली, तिला वर्षभराची फी माफ झाली. आणि तेव्हाच तिने टाइम्समध्ये चित्रं काढायला सुरुवात केली. वडलांकडे फीसाठी हात पसरायची वेळच तिने येऊ दिली नाही. डिग्री मिळवल्यावर तिने दिल्लीत जाहिरात कंपनीत नोकरी केली. तेव्हा एकटं राहात असताना आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नये, एवढं तिला नक्की कळलेलं होतं. कुटुंबाला मुलीची काळजी वाटणं साहजिक आहे, तेवढा विश्वास मुलींनी द्यायला हवा, असं ती म्हणाली. मुलींना सतत स्वत:ला सिद्ध करत राहावं लागतं, कोणत्याही क्षेत्रात, हे तिचं म्हणणं सर्वांनाच पटण्याजोगं आहे.
अश्विनीला आलेला एक अनुभव फार हृदयस्पर्शी आहे. लग्नाच्या मिरवणुकीचं दृश्य होतं. अश्विनीने ठरवून मुलीच साहाय्यक (assistant director AD) घेतल्या होत्या. त्यातलीच एक जेमतेम १८, १९ वर्षांची मुलगी या वेळी काम करत होती. तिची सुरुवातीला कोणी दखलच घेतली नाही, तिचं ऐकणं तर सोडाच. पण अखेरीस तिने तिचं काम पूर्ण केलंच. दिवस संपताना तिच्या लाइन डायरेक्टरने या मुलीच्या कामाची पावतीच अश्विनीला दिली. तो म्हणाला, AD लडकी तो कभी देखी नहीं थी. लेकिन आज घर जाकर बेटी को सिखाऊँगा कि, क्या बनना है!
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी झालेल्या स्वराने निल बट्टे करताना एक चांगला धडा मिळाल्याचं सांगितलं. वय वाढणं नाॅर्मल आहे, मूल होणं नाॅर्मल आहे, एक अभिनेत्री सामान्य माणूसच आहे, हे शिकले मी या चित्रपटामुळे, असं ती म्हणाली.
लाडलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हालाच ही छान भेट दिल्याबद्दल पाॅप्युलेशन फर्स्टचे आभार.
या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीत इथे पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=Yz9MFmANLGo

Comments
Post a Comment