संध्याकाळी आॅफिसातनं घरी जाताना लोकलमध्ये तिला तो गंध जाणवला. ब्रूटचा. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण तो शेजारच्याच पुरुषांच्या डब्यातनं आला असण्याची शक्यता होती.
दुसऱ्या दिवशीही तेच झालं. आज तर तिची ट्रेनही वेगळी होती. तिने प्रयत्नपूर्वक तो गंध मागे सारला आणि उद्या काय भाजी करायची त्याचा विचार करू लागली.
तिसऱ्या दिवशी तिने एक ट्रेन अलिकडची पकडली असेल, काम लवकर आटोपलं म्हणून. ठाण्याला उतरली. स्लो होती ट्रेन तरी नेमकी तीन नंबरवर आली. एस्कलेटर होता, पण लांब. कंटाळून पाय ओढत पश्चिमेला बाहेर आली. भाजी, फळं, मुलासाठी खाऊ काही घ्यायचंय का याची उजळणी केली. पण सगळं होतं घरात म्हणून ती रिक्षाच्या रांगेत उभी राहिली. दहाएक मिनिटांनंतर रिक्षा मिळाली. वसंत विहार सांगून ती बसली.
तर तोच गंध. मादक. काहीसा उत्तेजक. आणि आश्वासकही.
ब्रूट.
रिक्षावाला काही ब्रूटवाला वाटत नव्हता. तिने समजूत काढली मनाची, आपल्या आधी रिक्षात बसलेल्या कोणा युवकाचा रेंगाळत असेल.
पण आज ती त्या गंधाला मागे नाही टाकू शकली.
त्याच्यासोबत ती मागेच गेली. दहापंधरा वर्षं.
त्याचा वाढदिवस होता जवळ आलेला. काय बरं द्यावं, अशा विचारात होती. शी बाई, पुरुषांना काय द्यावं प्रश्नच असतो. शर्ट घ्यायचा तर नीट बसेल की, बदलून घ्यावा लागेल ही चिंता. मग काय, तर वाॅलेट. पण तीही त्याच्याकडे होती दोनतीन, एक तर तिनेच मागच्या वर्षी दिलेलं. रुमाल? उफ्, नकोच. मोजे? त्याला उगीच वाटायचं आपले आहेत ते मोजे फाटले आहेत की काय. पुस्तकं तर होतीच बाकी काही नाही सुचलं तर द्यायला, दोघांकडेही एकमेकांनी दिलेली कितीतरी होती.
मग तिला वाटलं छानसा परफ्यूम घ्यावा त्याच्यासाठी.
तेव्हा आॅनलाइन वगैरे भानगड नव्हती परफ्यूम घ्यायला. तिच्या आॅफिसच्या रस्त्यावर अजमल अँड कंपनी होतं, रीगलजवळ. पण तिथे अत्तरंच मिळतात, परफ्यूम नसतील, असं वाटायचं तिला. आत जायची हिंमत नव्हती. मेंदीने रंगवलेल्या केसांचा/दाढीचा पांढराशुभ्र कुडता पायजमा घातलेला मालक पाहून उगीचच पाऊल अडखळायचं. काचेआडून दिसणाऱ्या रंगबिरंगी मोहक आकाराच्या अत्तराच्या बाटल्या तिने अनेकदा पाह्यल्या होत्या, पण आत नव्हती गेली कधी.
मग तिला आठवलं, क्राॅफर्ड मार्केटमध्ये काही दुकानं आहेत. त्याच्याच सोबत पालथं घालायची ना ती मार्केट तेव्हा. मार्केटमध्ये शिरलं की डाव्या हाताला होती, कस्टमचा माल मिळणारी दुकानं. उजवीकडे फळं नि भाज्या. आणि सुंदरशी फुलं. जेव्हा फेरेरो रोशर चाॅकलेट्स आणि हर्शीज चाॅकलेट साॅस एखाददुसऱ्या डिपार्टमेंटल स्टोरमध्ये मिळायचा मुंबईतही, तेव्हा क्राॅफर्डमध्ये मात्र ते सगळं मिळायचं बिनधोक. आणि हवे ते शॅम्पू, टिश्यू पेपर, आणि इम्पोर्टेडच उपलब्ध होत्या अशा सगळ्या गोष्टी.
अखेर ती गेलीच परफ्यूम घ्यायला. कधी स्वत:साठीसुद्धा नव्हता घेतला असा विकत जाऊन, म्हणून जरा धडधडतच गेली.
ब्रूट काय न मस्क काय, नि ती सगळी फ्रेंच इटालियन नावं... सगळंच परकं होतं. ओ द कलोन ठाऊक होतं, ते आवडायचंही. मुंबईतल्या असह्य घामट उन्हाळ्यात तोच एक दिलासा होता. बाकी अत्तरं थोडीथोडी माहीत होती, घरी असायचीच अत्तरदाणीत ठेवण्यासाठी छोट्या जुनाट बाटल्यांमध्ये. आजी, पणजीपासून असावीत इतकी जुनी होती ती. आणि तिची एक मैत्रीण अत्तराच्या कारखान्यात काम करायची म्हणून जरा जास्त ओळख. केवडा, पारिजात, मोगरा, खस. तिचं आवडतं होतं मजमुआ. अर्थ नव्हता माहीत, पण त्याचा वास तिला आपला वाटायचा. अगदी तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेलसा.
तर, त्या दुकानात जाऊन परफ्यूम विकत घेताना गोंधळलेलीच होती ती. सेल्समनलाही ते लक्षात आलंच. त्याने विचारलंन, ‘कोणासाठी हवाय?’
‘मित्रासाठी.’
‘तो ये देखो,’ असं म्हणून त्याने पटकन एक स्प्रे हवेत मारला. तिच्या नाकापासून दूर, पण गंध पोचेल असा.
तिने दीर्घ श्वास घेतला. तोच तो. अगदी ताे. जशी ती मजमुआ, तसा तो ब्रूट.
ती दोघं एकमेकांपासून कायमचे दूर जाईस्तो तो कायम ब्रूट वापरायचा.
आता माहीत नाही, वापरत असेलही. किंवा सोडूनही दिलं असेल ब्रूट त्याने. त्यांची प्रत्यक्ष भेट अनेक वर्षांत नाही झालेली. पण फेसबुकवर मात्र ते फ्रेंड्स होते एकमेकांचे. क्वचित कधी भेटायचे, पण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये. त्यामुळे एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय ते त्यांना माहीत होतं, पण ब्रूट? अंहं, त्याचा गंधही उरला नव्हता त्या फ्रेंडशिपला.
तिने तरी कुठे मजमुआ वापरलंय हल्ली कित्येक दिवसांत.
लग्न झाल्यानंतर सगळंच बदललं होतं. मजमुआ तिचं राह्यलंच नव्हतं, किंवा ती मजमुआची राह्यली नव्हती. आता ती झाली होती कूल वाॅटर. काहीही झालं आजूबाजूला तरी कूल. तिच्या लाडक्या कॅप्टन कूल, एमएस ढोनीसारखी. कॅप्टनच तर होती ती, तिच्या घराची, आॅफिसची, मैत्रिणींच्या ग्रूपची. मध्यंतरी दुबईत गेलीवती तेव्हा राल्फ लाॅरेन घेतलं होतं तिने स्वत:साठी, ६५ डाॅलर्स खर्चून. पण त्याच्यापर्यंत ती कधीतरीच पोचायची. पहिला हात जायचा तो अॅक्वा ब्लू रंगाच्या उभट पेअर शेप बाॅटलकडे. कूल वाॅटरकडे.
रिक्षा बिल्डिंगच्या दारात थांबली, रिक्षावाल्याने लाइट लावला, तशी ती भानावर आली. शंभर रुपये त्याच्या हातावर टेकवले, उरलेले परत घ्यायचं भान मात्र नाही राह्यलं तिला.
अचानक थकल्यासारखं वाटलं तिला. लिफ्टसाठी थांबणंही नको वाटलं तिला. कशीबशी ती घरात गेली. मुलाची सुटी सुरू होती, त्यामुळे तो आजीकडे राहायला गेला होता. उद्या यायचा होता. नवरा बाहेरगावी गेला होता, एका आठवड्याने परतायचा होता.
एकटीसाठी काही स्वयंपाक करायचा तिच्या जिवावर आलं. सकाळची एक पोळी होती शिल्लक. छुंदा होताच, आणि मिरची, लोणची वगैरे. मग छोट्या कुकरमध्ये तिने खिचडी टाकलीन थोडीशी, पटकन शाॅवर घेतला. टीव्ही लावला, आज तिला काहीही पाहायला चालणार होतं. काहीही म्हटलं तरी एका विशिष्ट पातळीच्या खाली ती उतरू शकत नव्हती. म्हणजे मालिकांचं दळण नक्कीच नको होतं तिला. एरवी ती टीव्हीसमोर बसायचीही नाही. त्यामुळे चॅनल्सचे नंबरही माहीत नव्हते तिला फार. एवढंच लक्षात होतं की, ९५०नंतर एचडी चॅनल्स लागतात. मग ती थेट ९५१वर गेली. तर नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर नेमका सुगंध आणि स्त्रीपुरुष नातं या विषयावर माहितीपट सुरू होता. एरवी तिने तो अावडीने पाह्यला असता, पण आज ते शक्य नव्हतं.
ब्रूट तिच्या डोक्यातनं जात नव्हता. एखादा वास एका क्षणात कित्येक वर्षं मागे नेऊ शकतो, त्या विशिष्ट व्यक्तीला डोळ्यांसमोर उभं करतो, याचा अनुभव एरवी तिने खाद्यपदार्थांच्या संदर्भात घेतला होता. हळदीच्या पानाचा वास आला की ती थेट फोंड्यातल्या त्यांच्या जुन्या घरी जाऊन पोचते आणि चुलीसमोर बसलेल्या मोठ्या आईच्या हातच्या पातोळ्यांची चव तिला गुरफटून टाकते. वांग्याचं भरीत म्हटलं की तिची जळगावची मैत्रीण, केक म्हटला की मावशी, असं काहीबाही. कोणीकोणी.
पुढेपुढे गेली तर स्पोर्टस चॅनल्स. मग पुढे इंग्रजी चित्रपट. पण त्यातही काही धड नव्हतं. मारधाडपट काही तिला आवडायचे नाहीत. राॅमेडी नाउ बऱ्याचदा बंदच असायचं. स्टार वर्ल्डवर मयूर अँड राॅकीचं हायवे आॅन माय प्लेट लागलं होतं. एरवी तिला ते फार आवडायचं, पण आज नव्हतं लक्ष लागत. आपल्याला वेळ असतो तेव्हा टीव्हीवर काही नसतं, या तिच्या थिअरीवर तिने शिक्कामोर्तब केलं आणि टीव्ही बंद केला.
न राहवून तिने फोनवर व्हाॅट्सअॅप उघडलं.
फेवरिट्समध्ये जाऊन त्याचं नाव टाइप केलं.
त्यावर टॅप केलं नि चॅटची विंडो उघडली.
चक्क आॅनलाइन होता तो.
हाय...
हाय, आज कशी काय आठवण आली?
आली खरी, कारण कळून काय करणारेस?
अरेच्चा?
असो...
काय करतोयस?
घरी निघालोय, ऐरोलीच्या ट्रॅफिकमध्ये अडकलोय, १५ मिनिटं झाली. राइट मारला की खरं तर १० मिनिटांवर आहे घर...
लेफ्ट मोकळा आहे का?
अं?
लेफ्ट, आहे का मोकळा?
What are you trying to say?
Sometimes, the left view is also worth giving a thought. किती right wing राहशील सारखासारखा?
Are you...?
Yes
Sure?
Yes.
आलो.
तिने पत्ता मेसेेज केला आणि फोन बंद करून सोफ्यावरून उठली.
तिच्यात अचानक उत्साह संचारला. मगाचचा थकवा, कंटाळा कुठच्या कुठे गेला. त्याला भूक लागली असेल का, विचारायला हवं होतं जेवणारेय का ते.
लागली असेलच, विचारायचं काय त्यात.
फ्रिजमध्ये दोशाचं पीठ होतं काल वाटून ठेवलेलं. आणि मळगापुडी होतीच. पटकन दोसे घालता येतील. खिचडी होतीच. पापड भाजू पोह्याचा खमंग, ठसका लावणारा. त्याला दही वगैरे लागत नाही, तिला माहीत होतं.
तिने पटकन नाइट ड्रेस बदलला. तसा डिसेंट होता, पण नको वाटला तेव्हा.
जीन्स चढवली. काळी चेटकीण म्हणायचा तो, ती ब्लॅक ब्रा घातली. नि वर साधासा टाॅप. केसांचा बुचडा बांधून ठेवलावता तो सोडला आणि सैलसा शेपटा घातला.
कपाट उघडलं नि कूल वाॅटर शिंपडलं अंगावर. तेवढ्यात बेल वाजली.
पुन्हा अनेक वर्षांनी ब्रूटचा गंध. आणि साक्षात ब्रूट तिच्यासमोर उभा होता.
त्याला गच्च मिठी मारायला मोह तिने खूप प्रयत्नाने आवरला.
ये.
सुंदर दिसतेयस.
कोणता परफ्यूम आहे हा, मस्त आहे. अगदी तुझ्यासारखा. घायाळ करणारा.
शटाप.
अरे, खरं बोलतोय मी. शटाप काय?
काय घेणारेस? Coffee, tea or me?
Or?
No or. It's either me or no one.
Do I have a choice?
Do you want one?
Umm...
Bloody brute! विचार कसला करतोयस?
आणि तो तिच्या जवळ आला. तिला घट्ट जवळ घेतलं. तिचे ओठ त्याच्या ओठांना शोधत शोधत त्यांच्यापाशी पोचले आणि एकमेकांत गुंतले. त्याच्या वासाने ती धुंदावली, पूर्वीसारखी विरघळू लागली. तिचा तिच्यावर कंट्रोल उरला नाही. त्याने कंट्रोल करायचा प्रश्नच नव्हता. ते त्याला कधीच जमलं नव्हतं.
सगळं पूर्वीसारखंच होतं, ओळखीचं होतं. तरीही वेगळं होतं. तिची ती नव्याने काहीतरी शोधत होती. आज तरी ते सापडावं अशी तिची तीव्र इच्छा होती. आणि त्यासाठी त्याचीच मदत हवी होती तिला. ते काय आहे तिला ठाऊक नव्हतं. तिने त्याबद्दल वाचलं होतं, पण प्रत्यक्ष अनुभव नव्हता. मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना त्याच्याविषयी खूप बोलायच्या सगळ्याच. पण तरी ती, इतर अनेकींसारखी, त्यापासून दूरच होती.
अाज पहिल्यांदाच त्याने तिला विचारलं,
How was it?
How was it for you?
Beautiful.
For me too.
Enjoyed?
Hmmm
म्हणजे काय? Want something more?
Probably.
Tell me.
Show me the middle finger.
Oh, let me try.
त्याने ती सांगत होती तसे प्रयत्न केले, पण काही क्षणांतच ती वेगळ्याच लाटांवर हिंदोळू लागली होती. तिच्या मिटल्या डोळ्यांमधनंही त्याला दिसत होतं ते. ती अचानक एकदम शांतावली, निपचित झाली. How are you feeling असं विचारायची त्याला गरजच नव्हती.
थोड्या वेळाने दोघं जेवले. दोसे चटणी, खिचडी, एक पोळी त्यांनी वाटून खाल्लं. काही मिनिटं एकमेकांजवळ काही न बोलता, काही न करता ते बसून होते. आणि त्याने सहज हातावरचं घड्याळ पाह्यलं.
तिचा चेहरा पडला.
पण तिने स्वत:ला सावरलंन. हलकेच त्याला मिठीत घेतलंन, त्याचा वास मनात भरून घेतलान आणि त्याला जाऊ दिलंन.
तो गेल्यावर हसूच आलं तिला.
च्यायला त्या ब्रूटच्या... असं म्हणत कपडे बदलून पुन्हा नाइटी चढवून ती त्या रात्री पुन्हा एकदा बेडवर पसरली.
ती आणि झोप यांच्यामध्ये आता कोणीही येणार नव्हतं. अगदी ब्रूटसुद्धा.

Comments
Post a Comment