(१७ जुलै २०११ रोजी रसिक पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.)
आईने एका सकाळी मला लवकर उठवले, माझ्या हातात एक जॅकेट दिले. ‘तिकडे थंडी असेल,’ म्हणाली. टॅक्सीत बसून ती, मी, एक काकू आणि एक परिचित असे आम्ही फिलिपिन्समधल्या निनॉय अकिनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. तिथे आईने माझी एका माणसाची ओळख करून दिली. तो काका आहे, म्हणाली. त्याने माझा हात धरला आणि आम्ही दोघे विमानात बसलो. तो माझा पहिला विमानप्रवास. वर्ष होते 1993 आणि माझे वय होते 13 वर्षे.
माझे आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावे म्हणून आईने मला दूर अमेरिकेला माझ्या आजी-आजोबांकडे धाडले होते. माझी आजी आणि आजोबा सान फ्रान्सिस्को बे भागात राहायचे. मी सहावीत होतो. भाषा हा माझा आवडीचा विषय होता. मी त्या वर्षी शुद्धलेखनाची (स्पेलिंग बी) स्पर्धाही जिंकलो; पण त्यात मी अचूक लिहिलेल्या निम्म्या शब्दांचा मला उच्चारही येत नव्हता.
मी 16व्या वर्षी वाहनचालक परवाना घेण्यासाठी जवळच्या कार्यालयात गेलो. माझ्या बºयाच मित्रमैत्रिणींकडे परवाना होता, त्यामुळेच मलाही तो लवकर हवा होता. मी माझे ग्रीन कार्ड तिथल्या कारकुनाला दिले तेव्हा ती हळूच म्हणाली, ‘‘हे बनावट आहे, इथे परत येऊ नकोस.’’
भेदरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत मी सायकल दामटत घरी आलो, लोलोंना धारेवर धरले. म्हटले, माझे ग्रीन कार्ड बनावट आहे? माझ्या आजी-आजोबांनी अमेरिकी नागरिकत्व प्राप्त केले होते. मी तीन वर्षांचा होतो, तेव्हा माझे वडील आम्हाला सोडून गेले होते आणि तेव्हापासूनच आजोबा आईला पैसे पाठवत. आता माझ्या प्रश्नाने ते खूप दुखावल्यासारखे दिसले आणि त्यांनी कबूल केले की माझे ग्रीन कार्ड बनावट होते. ‘यापुढे कोणालाही ते दाखवू नकोस,’ त्यांनी मला बजावले.
तेव्हाच मी ठरवलं की याचा कोणाला संशयही येऊ द्यायचा नाही. जर मी खूप काम केलं, खूप काही कमावलं तर मला अमेरिकन नागरिकत्व मिळेलच.
मी प्रयत्न केला. गेली 14 वर्षं. मी शिकलो, पत्रकार झालो, अमेरिकेतल्या खूप मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या; पण तरीही अजून कागदपत्रे नसताना वास्तव्य करणारा स्थलांतरितच (अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट) आहे! त्यामुळे होतं एवढंच की, सतत पकडलं जाण्याची भीती वाटते, जवळच्या माणसांनाही मी खरा कोण आहे हे मला सांगता येत नाही, माझ्या मित्रांनी प्रश्न विचारू नये म्हणून माझ्या कुटुंबाची छायाचित्रं मला शोकेसमध्ये न लावता लपवून ठेवावी लागतात.
काम करण्यासाठी आवश्यक असतो सोशल सिक्युरिटी नंबर. नशीब माझं, आजोबांनी तो आधीच काढून ठेवला होता. लोलो आणि लोला 1984मध्ये अमेरिकेत आले. त्यांनी माझी आई आणि मामाला ग्रीनकार्ड मिळावे यासाठी प्रयत्न केले, मामा 1991मध्ये आला; पण आईचं अजूनही जमलेलं नाही. मी अमेरिकेत येताना अडचणी येऊ नयेत म्हणून आजोबांनी तब्बल 4,500 डॉलर्स एका माणसाला दिले होते. इथे आल्यावर त्यांनी माझ्या खºया नावासह पण बनावट फिलिपिनी पासपोर्ट बनवून घेतला. मला सोशल सिक्युरिटी नंबर मिळाला होता, पण त्यावर काही अटी नमूद केलेल्या होत्या. आम्ही तो भाग झाकून त्याच्या प्रती काढल्या आणि त्याच्या आधारे मी नोकरीच्या मागे लागलो.
जवळजवळ दहा वर्षं मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकºया केल्या, फारच कमी वेळा मालकांनी माझं मूळ सोशल सिक्युरिटी कार्ड पाहायला मागितलं. जेव्हा मागितलं तेव्हा मी त्यांना त्याची प्रत दाखवली, ती त्यांनी मान्य केली. पण हे करता करता माझ्या मनात मी उपरा आहे, अशी भावना अधिकाधिक तीव्र होत गेली. आणि पकडलं जाण्याची भीतीही वाढत गेली. पण मी ते करत राहिलो, कारण मला जगायचं होतं, त्यासाठी हाच एकमेव मार्ग होता.
शिक्षण झाल्यावर मी नोकरीच्या शोधात लागलो, खरं तर मला आणखी शिकायचं होतं, पण घरची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती आणि मला सरकारी मदत मिळू शकत नव्हती, कारण मी उपरा होतो. माझे दोघे शिक्षक माझ्या बाजूने होते, त्यांनी माझ्यासाठी अशी शिष्यवृत्ती शोधून काढली जिच्यासाठी मला नागरिकत्वाच्या पुराव्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे मी शिकू लागलो, अर्धवेळ वार्ताहर म्हणून काम करू लागलो. काही काळाने मी सिअॅटल टाइम्समध्ये शिकाऊ वार्ताहरपदासाठी अर्ज केला, तिथे माझ्या नागरिकत्वाचा प्रश्न आड आला. ‘टाइम्स’च्या व्यवस्थापनाने माझा अर्ज नाकारला. आता मी खराखुरा पेचात पडलो. सत्य सांगणे हा पत्रकारितेचा धर्म आणि मला पत्रकार म्हणून नोकरी करण्यासाठीच जर खोटं बोलावं लागणार असेल तर कसं व्हायचं?
मग मी एका वकिलाकडे गेलो. तिने सांगितलेला उपाय स्वीकारणं मला शक्यच नव्हतं. ती म्हणाली, फिलिपिन्सला परत जा, 10 वर्षांची बंदी स्वीकार आणि पुन्हा कायदेशीरपणे अमेरिकेत येण्यासाठी अर्ज कर. मग मी पुन्हा एकदा वाहनचालक परवाना काढायला गेलो. ओरेगन राज्यात परवान्यासाठीच्या अटी सर्वात शिथिल असल्याचे मला कळले. अनेक लटपटी करून मला परवाना मिळाला. आता 3 फेबु्रवारी 2011पर्यंत मला चिंता करण्याचं कारण नव्हतं. तोपर्यंत नक्कीच नवीन कायदा येईल आणि मी उप-याचा अमेरिकन होईन, अशी मला आशा होती.
या जोरावर मला ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये दोन वर्षांची शिकाऊ वार्ताहराची नोकरी मिळाली. ती करता करता परत मला भीतीने ग्रासले. माझ्या नागरिकत्वाबाबत बाकीच्या पत्रकारांना कळेल आणि माझे बिंग फुटेल, या भीतीने मला काम करणे अशक्य झाले. अखेर मी माझ्या बॉसला खरं काय ते सांगून टाकलं. बॉस मला एवढंच म्हणाला, ‘तू मला आता अधिक चांगला समजला आहेस.’ मी अधिक जोमाने कामाला लागलो. इतकी वर्षं केलेल्या फसवणुकीने मी अंतर्बाह्य व्यथित झालो होतो, मला मी काय करतोय, काय झालोय, का असे प्रश्न सतावू लागले.
दरम्यान, ‘पोस्ट’च्या वार्ताहरांच्या आमच्या गटाला 2008चे प्रतिष्ठेचे पुलित्झर पारितोषिक मिळाले. आमच्या नावाची चर्चा झाली. ते ऐकल्यावर लोला एवढंच म्हणाली, ‘लोकांना तुझ्या बनावट पासपोर्टबद्दल कळलं तर काय होईल?’ मी बाथरूममध्ये गेलो आणि ढसाढसा रडलो फक्त.
पत्रकारितेत मी जितका यशस्वी होत गेलो तसतसा अधिकाधिक भयभीत होत गेलो, निराश होत गेलो. मला माझ्या यशाबद्दल आनंद होताच पण माझा वाहनचालक परवाना संपायची मुदत जवळ येत होती, त्याचं काय? अखेर मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. कितीही व्यावसायिक यश मिळवलं तरी माझा नागरिकत्वाचा प्रश्न त्याने सुटणार नव्हता, हे मला कळून चुकलं होतं. मी माझ्या मित्रांशी खोटं बोलत होतो, कुणाशीच दीर्घकाळ नाते जोडू शकत नव्हतो.
सध्या मला तात्पुरता दिलासा मिळाला आहे कारण मला नवीन परवाना मिळाला आहे, 2016पर्यंतचा. पण मी आता खरं रूप दडवून धावताना थकलोय, माझं त्राण गेलंय, मला ते असुरक्षित आयुष्य पुन्हा नकोय. म्हणूनच मी माझी गोष्ट सांगतोय. पुढे काय होणार, हे अर्थातच मला माहीत नाही. पण मला एवढंच माहीत आहे की मला चांगलं जगण्याची संधी देणाºया आजी-आजोबांचा मी ऋणी आहे. आणि माझी स्वप्नं पूर्ण करण्यात मला मदत करणा-या माझ्या भूमिगत मित्रमंडळीचा.
माझ्या आईला भेटून मला 18 वर्षं झालीत. मी नुकताच तिच्याशी बोललो. मी तिला विचारलं की तिने मला विमानतळावर निरोप दिला तेव्हा काय केलं, काय म्हटलं होतं. ती म्हणाली, ‘मी तुला एवढंच सांगितलं की, तुला कोणीही विचारलं तू अमेरिकेला का आला आहेस, तर त्यांना सांग की डिस्नेलँड पाहायला!’ (defineamerican.com या वेबसाइटवरील लेखावर आधारित)

Comments
Post a Comment