कोणी
खरोखर पूर्ण आश्वस्त असतं
का?
कोणी खरोखर पूर्ण आश्वस्त असतं का?
मला
माहितीये,
मी
असते.
जेव्हा
स्वत:
केलेल्या
पहिल्या गाजरहलव्याचा फोटो
बाबा मला पाठवतो
जेव्हा
आई मी दिलेला दुपट्टा मिरवते
जेव्हा
सुटीनंतर काॅलेजच्या कँटीनमध्ये
जाता क्षणी मी काहीही न बोलता
अण्णा दोन कटिंग समोर ठेवतो
जेव्हा
गवई वरचा सा गाठतो,
श्रोत्यांची
उत्कंठा ताणली गेलेली असतानाच
जेव्हा
मी उत्तुंग शिखरावर असते
आणि आजूबाजूचे ढग शाळेत
काढलेल्या चित्रांसारखे
दिसतात
माझा
चहा बेचव होतो हे माहीत असूनही
आजोबा जेव्हा मला त्यांच्यासाठी
चहा करू देतात
जेव्हा
माझा जिवलग मित्र त्याच्या
विसाव्या वाढदिवसाला लाइटसेबर
भेट दिल्यावर लहान मूल होऊन
जातो
जेव्हा
माझ्या टीचर ओणमच्या दिवशी
माझ्यासाठी आठवणीने अवियल
आणतात
जेव्हा
माझा छोटा आत्तेभाऊ मी ११
वर्षांची असतानाचा माझा
सुपरमॅनचा राखी टीशर्ट घालतो
जेव्हा
मी शेकडो किमी दूर आणि खूप
उंचावर असते हिमालयात,
आणि
आईबाबापर्यंत फाेनवरनंच
माझ्या घशातला आवंढा,
माझे
हुंदके पोचलेले असतात
जेव्हा
माझे ओठ थरथर कापतात आणि माझा
आवाज फुटत नसतो,
मला
रडू येत असतं म्हणून नव्हे,
तर मला समोरच्या माणसाला
खाऊ की गिळू असं वाटत असतं
जेव्हा
परीक्षेच्या आधीच्या
अस्वस्थतेने माझे हात थरथरत
असतात आणि माझा पाय हलण्याचा
मी थांबवू शकत नाही
जेव्हा
डेंटिस्टच्या खुर्चीत
बसल्यावर थरकाप उडून मी गोठून
जाते
जेव्हा
मी पाच मिनिटांचं एक गाणं
सलग दोन तास ऐकत राहाते
जेव्हा
मी एकाच पानावर जणू अनंत
काळापासून अडकलेली असते
मी आश्वस्त असते.
जिथे
माझ्या मी असण्याला पूर्ण
परवानगी आहे,
मी
घरी असते.
जसजसे
मोठे,
वयस्कर,
प्रेमळ,
निरुत्साही
होत जाता,
अशी
घरं शोधा.
ती
तुमची नसतीलही कदाचित.
आसरा
घ्या,
पण
चिकटून राहू नका.
शिका
आणि स्वत:चं
घर बांधा.
एक
घर बांधायचा प्रयत्न तर करा
बाल्कनी
आणि गच्ची असलेलं.
सतत हल्ल्याच्या भीतीने,
अभेद्य
तटबंदी असलेला किल्ला नव्हे.
बोलवा,
स्वागत
करा,
खाऊपिऊ
घाला,
जोपासा,
कान
द्या
आणि
जेव्हा अपयश येईल
अपयश
आलं मैत्रहो,
तर
हे लक्षात घ्या
की,
हे
जगसुद्धा पाय रोवून उभं
राहण्यासाठी चाचपडतंय अजून.
|
Gargi's original poem.
"Is
anyone ever truly home?"
I
know I am.
When
Baba sends me a picture of the first gajar halwa that he made on
his own
When
Aai wears the dupatta I gave her
When
college reopens after holidays and Anna from the canteen readies
two 'cuttings' before I ask for them
When
the performer hits the upper 'Sa' after the audience has nearly
died of anticipation
When
I'm atop a mountain and the clouds look identical to how I drew
them in school
When
I offer to make tea for my grandfather and he happily accepts,
knowing
fully well my tea doesn't taste like tea
When
my best friend turns into a child when I gift him a Lightsaber on
his 20th birthday
When
my teacher remembers to get me Aviyal on Onam
When
my little cousin wears my grey Superman t-shirt from the time I
was eleven.
When
I'm hundreds of kilometers away and several thousand feet above
sea level, on the phone with my parents, and nothing but sobs and
sniffles find their way out of my throat
When
my voice cracks, lower lip quivers, not because I want to cry but
because I want to beat the living daylights out of the person in
front of me
When
my hands tremble and I can't stop shaking my foot because of
anxiety before an exam
When
I can't move a muscle because I'm almost literally petrified of my
turn at the dentist
When
I spend two hours listening to the same 5-minute song
When
I am on the same page for what feels like...a really long time.
I'm
home.
Home
is where I'm allowed.
As
you grow, up, older, warmer, colder
Look
for homes; they may not be yours.
Take
shelter - don't settle
Learn,
and build your own.
Build
a home, try -
one
with a balcony and a terrace.
Not
a fortress surrounded by defensive walls, always expecting attack.
Invite,
welcome, feed, nurture, listen.
And
if you fail,
when
you fail, sweetheart
remember
-
even
the Universe is still finding its footing.
|
Comments
Gargi.... SUPERLIKE !!
ReplyDeleteदेवा, हे काय भन्नाट लिहिलंय या मुलीने. फार मस्त. अनुवादही बरा जमलाय... हे हे हे... जस्ट किडिंग. मायलेकी रॉक!!!
ReplyDeleteधन्यवाद मंजिरी आणि मुकेश.
ReplyDeleteमस्तच जमलंय मराठीकरणही! पण गार्गीचं ओरिजिनल ते ओरिजिनल!
ReplyDeleteमेधाताई, बरोबरच आहे तुझं. पण मला ते मराठीतही असायला हवं असं वाटलं म्हणून केलं गं.
ReplyDeleteफार छान लिहिलंय. आणि तुम्ही केलेला अनुवादही समर्पक झालाय. दोन्हीही आवर्जून वाचावे असेच!
ReplyDeleteधन्यवाद.
Delete