In an evening class at Stanford, the last lecture was on the mind-body connection – the relationship between stress and disease. The speaker (head of psychiatry at Stanford) said, among other things, that one of the best things that a man could do for his health is to be married to a woman, whereas for a woman, one of the best things she could do for her health was to nurture her relationships with her girlfriends. At first everyone laughed, but he was serious. Women connect with each other differently and provide support systems that help each other to deal with stress and difficult life experiences.
हा मेसेज व्हाॅट्सअॅपवर दर काही महिन्यांनी फिरत असतो. मैत्रिणी किती आवश्यक आहेत, ते सांगणारा. स्टॅनफर्ड विद्यापीठाने खरोखरीच असं काही संशोधन केलंय का ते ठाऊक नाही, मी गूगलताईंची मदत घेतली, पण ठोस काही सापडलं नाही. त्याची खरं तर गरजही नाहीये, माझ्या मैत्रिणींवरून मला हे नीटच समजलेलं आहे. तासभराची भेट असो वा गप्पांमध्ये घालवलेली अख्खी रात्र, मैत्रिणींसोबत घालवलेला वेळ हा प्राणवायू असतो. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा काही तक्रारी सांगतो, त्यावर उपाय शोधतो, रडतो, असं नसतं. अनेकदा निव्वळ निरर्थक व असंबद्ध वा संदर्भहीन गप्पाही मारतो. त्यांच्यासोबतचं दिलखुलास हसणं, एकमेकींचे लाड करणं, छान पदार्थ खाऊ घालणं, मस्त भेटी देणं, मांडीवर डोकं ठेवून लोळणं, कधी गप्पा मारताना डोक्याला मसाज करून देणं, एकमेकींची काळजी करणं, व्यायाम करतेयस ना नियमित असं विचारून खात्री करून घेणं, पुस्तकं, सिनेमे, नाटकं सुचवणं, असं बरंच काही घडतं. दरवेळी न चुकता आम्ही, ओव्हरनाइट ट्रिपला जाऊ या गं एकदा, कध्धीच गेलो नाहीये, असंही एकमेकीला सुचवतो. गेल्या तीस वर्षात एकदाही गेलो नाहीये पण! तीस वर्षं म्हणजे, आतापर्यंतच्या आयुष्याच्या दोन तृतियांशहून अधिक काळ. शाळेतल्या मैत्रिणी तर त्याही आधीच्या. माझ्या मेंदूतला आणि हृदयातला फार मोठा पैस या वेड्या मुलींनी व्यापून टाकलाय. त्याबद्दल फक्त थँक्यूच म्हणू शकते.
Mala, we missed you so much. and yes, we did talk about coming to Sirsi soon!
मुलगे सर्वसाधारणपणे जिथे जन्मतात तिथेच राहतात, ५० टक्के तरी नक्कीच. ७५ टक्के मुली मात्र लग्न होऊन गाव सोडून जातात. गाव सोडल्यावर मित्रमैत्रिणी सुटतात, हा सगळ्यात मोठा तोटा. आता व्हाॅट्सअॅपमुळे किमान व्हर्चुअल भेटी होत राहतात, पण आज ४५च्या पुढे असणाऱ्या मुलींना हे संपर्कात राहाणं कठीण होतं. म्हणूनच, आम्ही इतकी वर्षं एकमेकींच्या सोबत आहोत, हे मला लई भारी वाटतं.

Comments
Post a Comment