सकाळी रोजच्या ट्रेनसाठी प्लॅटफाॅर्मवर उभी होते. आज शनिवार, त्यामुळे रोजच्या मैत्रिणी नव्हत्या. इतक्यात पूर्वी नियमित येणारी पण गेल्या अनेक दिवसांत न दिसलेली एक मुलगी आली. ती क्रीडापटू आहे, रेल्वेत नोकरी करते इतकं माहीत होतं, कधी बोलणं नव्हतं झालं तिच्याशी. ती कायम जीन्स टीशर्टमध्ये असायची, अनेकदा ट्रॅकपँटही. कधीतरी एकत्र गप्पांमध्ये एेकलं होतं तिच्याकडनं की, मी पहाटे लवकर उठते, भरपूर पळून येते. सकाळचा वेळ खायला उठतो मला नंतर, या ट्रेनच्या वेळेची वाट पाहात असते. एकदोनदा मी रिक्षात असताना रात्रीचंही तिला पळताना पाह्यलं होतं.
खूप दिवसांनी दिसली म्हणून विचारलं, कहाँ थी इतने दिन, जल्दी जाती थी क्या?
तर म्हणाली, हा जल्दी. लेकिन मैं अब जा रही हँ छोड के यहाँ से.
म्हटलं, कुठे?
कोलकाता ट्रान्सफर माँगा था, मिल गया. अगले महिने चली जाऊँगी.
तू अॅथलीट आहेस का?
नाही, क्रिकेटर आहे. एक मॅच इंडियन टीमसाठीही खेळलेय.
आईशप्पथ. भारीच.
तितक्यात ट्रेन आली, मग पुढच्या गप्पा ट्रेनमध्ये रंगल्या.
अगदी लहान वयात, म्हणजे १७व्या वर्षी बहुधा, तिला रेल्वेत नोकरी मिळाली होती. रेल्वेच्या टीममध्ये ती खेळली काही वर्षं, पण नंतर खांद्याची शस्त्रक्रिया झाल्याने ते थांबलं. त्यापूर्वी बंगालच्या टीमतर्फे पाचेक वर्षं ती रणजीचे सामने खेळली होती.
बंगाल म्हटल्यावर मी झुलन गोस्वामीचं नाव घेतलं, द. आफ्रिकेतल्या चौरंगी सामन्यात तिने महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम नुकताच केलाय, तिच्यावर मी नुकतंच लिहिलंही होतं. (https://mrinmayeeranade.blogspot.in/2017/05/blog-post.html)
झुलनचं नाव घेतल्यावर बाई एकदम खुलली.
झुलनचं आणि हिचं गाव जवळजवळ. त्यामुळे दोघी एकत्र खेळल्या तर आहेतच, पण प्रवासी एकत्र खूप केलाय.
पहाटे ४.१०ची ट्रेन पकडून दोघी कोलकात्याला येत, विवेकानंद पार्कवर ट्रेनिंगसाठी. झुलन ताडमाड उंच, ५ फूट ११ इंच. ही साधारण ५.४ असेल. त्या ट्रेनमध्ये अनेक क्रीडापटू असत, कोलकात्याला जाणारे. झुलनदी इतकी उंच की, तिचं डोकं अनेकदा दारावर, हँडलला आपटायचं. पहाटेचं विमान पकडायचं असलं की दोघी मध्यरात्री एकच्या सुमाराला टॅक्सीत बसत आणि गाढ झोपी जात मागे. मग अडीचतीन तासांनी डमडम विमानतळ आला की, टॅक्सीवाला त्यांना जागं करत असे.
एकदा रणजी सामना होता. या मुलीची नानी मॅच पाहायला आली होती. ती नातीला म्हणाली, मला झुलनला पाहायचंय. झुलन त्या भागात खूप प्रसिद्ध, सेलिब्रिटीच जणू. मॅच संपल्यावर हिने झुलनदीला सांगितलं, दीदी, आप सिर्फ थोडा ड्रेसिंग रूम के बाहर आओ, नानी को आप को देखना है. तिने हिला इडियट म्हटलं, खूप काय काय बोलली, असं करतात का म्हणून. आणि बाहेर येऊन नानीच्या समोर आली, तिच्या पाया पडली, गप्पा मारल्या. त्यांना म्हणाली, तुम्हाला कधी मला भेटावंसं वाटलं, मला सांगा, मी घरी येईन, या इडियटला नका सांगू.
झुलनदी खूप साधी आहे, गर्व नाही कशाचाच तिला. आताही मी तिला मेसेज केला होता, तर उत्तर दिलं तिने, असं म्हणाली.
ही मुलगी नऊ वर्षं ती मुंबईत क्वार्टर्समध्ये एकटी राहात होती. छान टू बीएचके फ्लॅट होता, त्यामुळे ओळखीपाळखीचे, मुंबईत काम असलेले अनेक जण या काळात तिच्याकडे राहून गेले. आता वडील आजारी असतात, म्हणून तिने बदली मागितली. अशा request transfer मध्ये पोस्ट खालची मिळण्याची शक्यता असते, पण चालेल म्हणाली. घरीच राहेन, त्यामुळे खर्चही कमी होईल. आईवडील खूप खूष आहेत मी परत येणार म्हणून. अब जा के शादी करेगी ना, असं मी चेष्टेत म्हटलं. तर म्हणाली, हो, आता २७ वर्षांची झालेय. करायचं लग्न तर आता करायलाच हवं.
तिला शुभेच्छा देऊन दादरला उतरले, तेव्हा हेच डोक्यात होतं की, इतक्या दिवसांत कधीच तिच्याशी गप्पा नाही मारल्या. तिचं नावही आजच कळालं, बंगालीत सांगायचं तर आॅन्येषा माॅइत्रा, मराठीत अन्येषा मित्रा.
दादरला उतरून माहीमसाठी ट्रेन पकडायला पश्चिमेला आले तर माझी एलआयसीतली मैत्रीण भेटली. आज लवकर निघायचंय, सचिन पाहायला जायचंय, म्हणाली. सचिनची आई त्यांच्या आॅफिसात होती. तो यशस्वी झाला आणि त्यांनी नोकरी सोडली. त्यांच्या निरोप समारंभाला तो यावा, असं आॅफिसातल्या लोकांनी सुचवलं. खरोखरच सचिन आणि त्याची बायको समारंभाला आले, एलआयसीतल्या कळकट्ट कँटीनमध्ये, मोडक्यातोडक्या टेबलावर बसून जेवलेही. एलआयसीतल्या क्रीडास्पर्धांच्या बक्षीस समारंभालाही तो अनेकदा आल्याची आठवण मैत्रिणीने सांगितली.
एकुणात आजचा दिवस असा छान खेळमय सुरू झाला.

Comments
Post a Comment