दिल्लीतल्या एका मैत्रिणीला गेल्या आठवड्यात अालेला हा अनुभव. तिने
एका कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन केला, पुढचा संवाद इंग्रजीत झाला.
हॅलो.
सर, तुम्हाला तुमची आॅर्डर रद्द करायचीय का सर?
मॅडम, सर नाही.
सर, तुमची आॅर्डर रद्द करायचीय का?
कृपया, मला सर म्हणू नका. तुम्ही जेव्हा महिला ग्राहकांशी बोलता तेव्हा त्यांना मॅम म्हणायला हवं. महिलांना सर म्हणणं ही फार चांगली गोष्ट नाही.
सर, तुमची आॅर्डर…
तुम्ही मला कृपया सर म्हणायचं बंद कराल का?
सर, काय म्हणताय, सर?
कृपया मला सर म्हणायचं थांबवा. तुम्ही जेव्हा महिला ग्राहकांशी बोलता तेव्हा त्यांना मॅम म्हणायला हवं. महिलांना सर म्हणणं ही फार चांगली गोष्ट नाही.
का?
महिलांना सर म्हणणं अपमान करण्यासारखं आहे.
साॅरी मॅम, आॅर्डर रद्द करायचीय का?
झटपट इंग्रजी बोलणं शिकण्याच्या क्लासला जाऊन इंग्रजीचा रट्टा मारून नोकरी मिळणंच खरं तर कठीण. परंतु, वासरात लंगडी गाय शहाणी, या न्यायाने या ग्राहक सेवा कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली असावी. भारतात सुशिक्षितांची संख्या वाढतेय, इंग्रजी बोलू शकणारेही वाढताहेत, असं आपण वाचत असतो. परंतु, यातले नोकरी वा काम करायला लायक किती जण आहेत, तंत्रकुशल किती आहेत, याचा अंदाज या संभाषणावरून आपण करू शकतो. शाळा व वेगवेगळ्या पदव्या, पदविका देणारी महाविद्यालयं खेडोपाडी उगवलीत. त्यातनंच अशी तरुण मुलंमुली ‘शिकून’ बाहेर पडताहेत. पण तरीही नोकरी मिळत नाहीये. दुसरीकडे अनेक कंपन्या सतत माणसं शोधत असतात, त्यांना योग्य, लायक, व कुशल कर्मचारी मिळत नाहीयेत.
पालकांकडे पैसा आहे म्हणून देणगी देऊन प्रवेश घ्यायचा, या ना त्या मार्गाने
पदवी हातात पाडून घ्यायची. एक वेळ ओळखीवर नोकरीही मिळू शकेल या पदवीवर, पण
त्या नोकरीत टिकून राहायचं, पुढे जायचं, प्रगती करून घ्यायची तर स्वत:
बुद्धी चालवावी लागते, हातपाय चालवावे लागतात, ते दुसरं कोणी करू शकत नाही,
हे लक्षात घ्यायला हवंय. तातडीने.हॅलो.
सर, तुम्हाला तुमची आॅर्डर रद्द करायचीय का सर?
मॅडम, सर नाही.
सर, तुमची आॅर्डर रद्द करायचीय का?
कृपया, मला सर म्हणू नका. तुम्ही जेव्हा महिला ग्राहकांशी बोलता तेव्हा त्यांना मॅम म्हणायला हवं. महिलांना सर म्हणणं ही फार चांगली गोष्ट नाही.
सर, तुमची आॅर्डर…
तुम्ही मला कृपया सर म्हणायचं बंद कराल का?
सर, काय म्हणताय, सर?
कृपया मला सर म्हणायचं थांबवा. तुम्ही जेव्हा महिला ग्राहकांशी बोलता तेव्हा त्यांना मॅम म्हणायला हवं. महिलांना सर म्हणणं ही फार चांगली गोष्ट नाही.
का?
महिलांना सर म्हणणं अपमान करण्यासारखं आहे.
साॅरी मॅम, आॅर्डर रद्द करायचीय का?
झटपट इंग्रजी बोलणं शिकण्याच्या क्लासला जाऊन इंग्रजीचा रट्टा मारून नोकरी मिळणंच खरं तर कठीण. परंतु, वासरात लंगडी गाय शहाणी, या न्यायाने या ग्राहक सेवा कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली असावी. भारतात सुशिक्षितांची संख्या वाढतेय, इंग्रजी बोलू शकणारेही वाढताहेत, असं आपण वाचत असतो. परंतु, यातले नोकरी वा काम करायला लायक किती जण आहेत, तंत्रकुशल किती आहेत, याचा अंदाज या संभाषणावरून आपण करू शकतो. शाळा व वेगवेगळ्या पदव्या, पदविका देणारी महाविद्यालयं खेडोपाडी उगवलीत. त्यातनंच अशी तरुण मुलंमुली ‘शिकून’ बाहेर पडताहेत. पण तरीही नोकरी मिळत नाहीये. दुसरीकडे अनेक कंपन्या सतत माणसं शोधत असतात, त्यांना योग्य, लायक, व कुशल कर्मचारी मिळत नाहीयेत.
Comments
Post a Comment