सचिन कुंडलकर गुलाबजाम असा, (नाव नसेल कदाचित तेव्हा जाहीर झालेलं पण स्वयंपाकाभोवती फिरणारा,) काही सिनेमा करतोय, हे मागच्या वर्षी माहीत झालं होतं कारण सायली राजाध्यक्ष त्याच्यासाठी food stylist म्हणून काम करत होती हे तिने सांगितलं होतं. सिनेमात असं काही काम असतं, असू शकतं, असायला हवं हे कळण्याचीच ही पहिली वेळ. सचिन कुंडलकरचं लोकरंगमध्ये जे सदर येत होतं गेल्या वर्षी, त्यातही अधनंमधनं याचे उल्लेख यायचे बहुधा. यथावकाश प्रोमो आला, आणि हे प्रकरण काहीतरी भारी असणारेय हे नक्की झालं. पण प्रोमोत आहे तसा सिनेमा अर्थात सरळसाधा नाही, प्रोमो काहीसा फसवाच आहे, असंही वाटून गेलं.
डबे करून देणारी एक मध्यमवयीन, चाळिशीच्या आतलीच. अगदी साधी राहणारी. तिचं पुण्यातलं जुनं घर. घरातली जुनी भांडी. आणि तिच्या हातचा नजर खिळवून ठेवणारा स्वयंपाक. सिनेमाच्या पडद्यातनं गंध बाहेर येत नसला तरी रंग आणि आवाजातनं आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या तंत्रज्ञाची कमाला. चरचरीत फाेडण्या, पांढराशुभ्र आेला नारळ भुरभुरवलेली भेंडीची भाजी, व्यवस्थित भाजलेल्या घडीच्या पोळ्या, कुरकुरीत भजी, वगैरे वगैरे शाकाहारी स्वयंपाक करणारी राधा आगरकर. लंडनमधली भरपूर पगाराची नोकरी सोडून मराठी पुणेरी स्वयंपाक शिकायला तिच्याकडे येणारा आदित्य. या दोघांमध्ये जुळून येणारे बंध, त्यानंतर समोर आलेला राधाचा भूतकाळ, आणि आदित्यचं सतत डोळ्यांसमोर दिसणारं स्वप्न या सगळ्यात आपण गुंतून जातो. स्वयंपाक करणारा पुरुष हिंदी चित्रपटांतनं पार मागे बावर्चीत राजेश खन्ना किंवा सलाम नमस्तेमध्ये सैफ पाहिलाय. यापेक्षा वेगळेही असतील, मी पाहिलेले नाहीत. यातल्या आदित्याची पॅशन अगदी सहज समोर येते, त्याने पोळ्याही लाटल्यात, कणीकही भिजवलीय. मला फार आवडलं ते त्याचं रडणं. राधाचा भूतकाळ कळल्यानंतर त्याला रडू येतं ते सिद्धार्थ चांदेकरने खूप नैसर्गिक दाखवलंय. म्हणजे मला नाही रडू आलं ते पाहून, पण तो का रडत असेल हे त्याने एक शब्दही न बोलता कळलंच. असा मनसोक्त रडणारा हिरोही तसा विरळाच आपल्याकडे. सिनेमाला गोष्ट म्हणावी तर इतकीच.
राधाचं घर फारच अभ्यास करून रंगवलंय. काहीसा गोठलेला भूतकाळ, म्हणजे साधारण ९०चा, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींतनं समोर येतो. भरतकाम केलेला पांढरा पलंगपोस, खुर्चीच्या पाठीवरचं भरतकाम केलेलं कव्हर, फडताळ, जुन्या साडीचे केलेले पडदे, हे सगळं राधाच्या व्यक्तिरेखेला दुजोराच देणारं. खूप चिडल्यावर ती आदित्याला जे बोलते ते फक्त राधाच बोलू शकते असं. तिचे कपडे, तिची छोटी पर्स – सहसा दािगने घेतल्यावर मिळते तशी, स्लिपरवर्गीय चपला, सगळंच फार विचारांती केलेलं.
आदित्यचे कपडे ठीकठाक. सिद्धार्थ देखणा आहे, त्याने काहीही घातलं तरी चांगलाच दिसतो म्हणा. लक्षात राहातो तो काही मिनिटं पडद्यावर दिसणारा चिन्मय उद्गीरकर. चिन्मय टीव्हीवरच्या मालिकांमध्ये दिसतो तेव्हा अगदीच also ran वर्गातला वाटतो. पण गुलाबजाममध्ये दाढी, अंमळ मोठी चष्म्याची फ्रेम आणि स्मार्ट कपडे यांमुळे भाव खाऊन जातो.
सायलीने यात केलेल्या कामाबद्दल तिने तपशीलवार लिहिलंच आहे. पडद्यावर ते अद्भुत दिसतंय. उकळत्या तेलात सोडली जाणारी भजी असोत, उकडीचे मोदक असोत, की आदित्याला राधापर्यंत नेणारे गुलाबजाम; सगळं आपल्यासमोर खरंखरं तयार होतंय, असंच वाटतं. हा सिनेमा थ्रीडी असता तर बहुतेक प्रेक्षकांचे हात गुलाबजाम किंवा भजी, उचलायला पुढे झाले असते हे निश्चित. पारंपरिक महाराष्ट्रीय स्वयंपाकातली रंगसंगती या सिनेमातून अत्यंत मोहकपणे दिसून येते.
सिनेमातनं कोणताही संदेश वगैरे दिलेला नाहीय, तसा छुपासुद्धा प्रयत्न नाहीय. हे उत्तमच.
दोनतीन छोट्या गोष्टी खटकल्या. सबटायटल्स अजिबातच जमलेली नाहीत. रेणुका शहाणेच्या तोंडची पहिली दोन वाक्यं एका मराठीच्या एका विशिष्ट बोलीतली आहेत, पण पुढचं मात्र ती प्रमाण मराठीतच बोलते. आधीच्या दृश्यात सिद्धार्थच्या खांद्यावर नसलेली बॅग पुढच्या सीनमध्ये त्याच्या खांद्यावर येते, वगैरे. पण हे अगदीच फुटकळ आक्षेप आहेत, ते सिनेमाच्या रसास्वादात बिलकुल येत नाहीत.
असा हा आतपर्यंत मुरलेला गुलाबजाम. नक्की चाखायलाच हवा असा.

Comments
Post a Comment