So here is how I do it.
* Use different daals.
We have yellow moong daal, masur daal and toor daal mixed for everyday use. So that is one option. Use only toor daal, which I do when I am making simple varan bhat, the typical Maharashtrian वरणभाततूपलिंबू. I sometimes use only green moong daal. Sometimes, only yellow moong daal. sometimes all these mixed, alongwith a handful of chana daal. Aai makes a dal with Urad dal, but I don't like it one bit ;)
* Use different phodni/tadka/vaghar
I sometime pour tadka on the daal and bring to a boil. Sometimes, i make tadka and pour the daal on it and then boil.
For tadka -
* oil-hing-rai-green chilies-curry leaves.
* oil-hing-jeera-red dry chili-garlic
* ghee-jeera-green chilies
* the Bengali panch-foron.
* the Bengali panch-foron.
Other ingredients
* Use either of these - kokum/tomato/lemon/tamarind
* Use fresh coconut-tomato
* Use goda/kala masala, or no masala at all. Daughter prefers 'yellow daal', without the homemade kala masala.
* Use sambar powder instead of kala masala.
* Add methi leaves or kasuri methi or spinach leaves.
* Add some vegetable pieces to the daal. Pieces of radish, brinjals, turai (दोडका), pumpkin, etc. give a different taste to the daal.
* Add methi leaves or kasuri methi or spinach leaves.
* Add some vegetable pieces to the daal. Pieces of radish, brinjals, turai (दोडका), pumpkin, etc. give a different taste to the daal.
The Konkani people make a Vatapachi Daal वाटपाची डाळ. Vatap is a mixture of onion, fresh coconut, jeera, turmeric, salt, and green chili. grind all this together, add to the cooked daal and boil. no tadka.
This post can't be complete without my favourite dalvange - daal with brinjals - डाळवांगे. It is finger licking yummy, especially when cooked by me eldest aunt, or my mother. I make a decent dalvange but it is nowhere near theirs.
This post can't be complete without my favourite dalvange - daal with brinjals - डाळवांगे. It is finger licking yummy, especially when cooked by me eldest aunt, or my mother. I make a decent dalvange but it is nowhere near theirs.
Coriander is a must on all types of daal.
What's your style of daal?
डाळ, आमटी, फोडणीचं वरण, साधं वरण हे आपल्या प्रत्येक जेवणात, किंवा दिवसभरातल्या एकातरी जेवणात असतंच. याचे अनेक प्रकार आपण करत असतो. तरीही मला ते पुरेसे वाटत नाहीत, चारपाच दिवस सलग आमटी केली की, वाटतं तेचतेच करतोय आपण.
मी काय करते ते सांगते.
डाळी
फक्त तुरीच्या डाळीचं वरण जेव्हा टिपिकल मराठी/ब्राह्मणी पद्धतीचं वरणभाततूपलिंबू असतं तेव्हा. किंवा रसम/सांबार करण्यासाठी. एरवी आमच्याकडे मसूर, तूर, आणि मुगाची पिवळी डाळ सम प्रमाणात एकत्र करून ठेवलेली असते तीच रोज वापरली जाते. कधी मुगाच्या सालासकट डाळीचं वरण. कधी या सगळ्या डाळी, आणि त्यात थोडी चणाडाळ घालून दालफ्राय सारखं करते.
फोडणी
फोडणी कधी तेलाची, कधी तुपाची. दालफ्राय केलं तर अमूल बटरची.
तेलाच्या फोडणीत कधी मोहरी, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीलिंब घालते. कधी लाल मिरची आणि कढीलिंब. कधी लसूण. तुपाच्या फोडणीत जिरं, हिंग, हिरवी मिरची. कधी बंगाली पद्धतीची पांच फोरोन. या फोडणीत मोहरी, जिरं, बडीशोप, कलोंजी आणि मेथीदाणे असतात.
कधी वरणावर फोडणी देऊन उकळी आणायची. कधी पातेल्यात/कढईत फोडणी करून वरनं वरण घालून उकळी आणायची.
कधी काळा/गोडा मसाला वापरायचा, कधी नाही. लेकीला मसाला न घातलेलं, पिवळं वरण आवडतं.
आंबट म्हणून आमसूल, लिंबू, क्वचित चिंच, किंवा टोमॅटो. कैरीच्या मोसमात कैरीची फोड एखादी, किंवा कोय.
गोड शक्यतो गूळच. साखर मी नाही घालत, पण आई घालते अनेकदा.
कधी ओला नारळ.
कधी ताजी मेथी कधी कसुरी मेथी. कधी पालक घालून दालपालक.
डाळवांगं या अद्वितीय प्रकाराचा उल्लेख केल्याशिवाय हा ब्लाॅग अपुराच राहील.
कधी ताजी मेथी कधी कसुरी मेथी. कधी पालक घालून दालपालक.
डाळवांगं या अद्वितीय प्रकाराचा उल्लेख केल्याशिवाय हा ब्लाॅग अपुराच राहील.
ताजी कोथिंबीर यातलं साधं वरण सोडल्यास सगळ्यावर आवश्यक.
कोकणी लोक एक वाटपाची डाळ करतात. कांदा, नारळ, हिरवी मिरची, जिरं, हळद, आणि मीठ मिक्सरवर बारीक वाटायचं आणि शिजवलेल्या वरणात घालून उकळायचं. फोडणी द्यायची नाही.
तुम्ही कशी करता आमटी? आमटीच्या पर्यायांबद्दल आपण अनेकदा बोलतो, म्हणजे पिठलं, कढी, सार, वगैरे. आमटीविषयी चर्चा मी फारशी नाही वाचलेली.
डाळवांग्याची रेसिपी सांगा 🙏
ReplyDeleteतुरीची डाळ शिजवताना मूठभर चण्याची डाळही घालायची. काटेरी वांगी चिरून घ्यायची. चिंच पाण्यात भिजवून ठेवायची. सुक्या खोबऱ्याचा तुकडा गॅसवर चांगला खरपूस भाजून घ्यायचा. हे भाजलेलं खोबरं आणि जिरं खलबत्त्यात कुटून घ्यायचं. तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करायची. थोडं आलं किसून किंवा ठेचून घालायचं. वांगी घालायची. लाल तिखट घालायचं आणि वांगी शिजवून घ्यायची. हवं तर झाकणावर पाणी ठेवायचं. वांगी शिजली की डाळ घोटून घालायची. काळा मसाला, मीठ, चिंचेचा कोळ, गूळ, जिरंखोबरं सगळं घालायचं. खळखळ उकळू द्यायचं. डाळवांगं काळसरच दिसतं. हे उरलेलं दुसऱ्या दिवशी अधिक चविष्ट लागतं, छान मुरल्यानंतर. ही खास सातारा भागातली आमटी.
Delete:-) good one
ReplyDelete