प्रीटेंड अँड प्ले
सकाळी पोळ्या करताना घामाने चिंब झाली होती ती
जवळच ठेवलेला रुमाल घेऊन घाम पुसताना
त्याचा आवाज कानात घुमला,
'अशी घामट साॅलिड सेक्सी वाटतेस तू!'
उन्हाळ्याच्या सुटीमुळे काहीशा रिकाम्या लोकलमध्ये टेकायला मिळालं सकाळी तिला.
पहिल्यांदाच फोन हातात घ्यायला मिळाला होता सकाळपासून.
त्याने पिंग केलं होतं नुकतंच.
कधीतरी मूडमध्ये असताना करतो तसं आॅडिओ,
त्याच्या अशक्य सेक्सी, नुकतीच जाग आलेल्या आवाजात,
'कुठे आहेस, काय घातलंयस?'
आजूबाजूला असलेल्या बायांचा विचार न करता,
तिनेही आॅडिओ पाठवला,
"आज साडी नेसलेय खूप दिवसांनी,
आणि स्लीव्हलेस ब्लाउज.
पण तू अजून बेडमध्येच असशील ना,
नेहमीच्या ब्लॅक शाॅर्टसमध्ये?'
अपेक्षेनुसार व्हिडिओ काॅल आलाच लगेच
"इकडे ये ना...'
"हो, आलेच, तिथेच तर निघालेय.'
"नाही, खरी ये.'
"येतेच.'
"उडत ये.'
"ही काय, पोचलेच की.'
पोचल्यानंतर पुढे काही बोलण्याची गरजच पडली नाही त्यांना.
फोनचं नेटवर्कही गेलंच होतं नेहमीप्रमाणे.
रात्री अंथरुणावर पाठ टेकतेय तोच पिंग
'काय करतेयस, काय घातलंयस?'
'तुझा मळकट मऊ नाइटगाउन ना?'
'हो, तोच.'
"ये ना मग.'
'नको, तू तर आॅफिसात असशील.
आणि आता मी खूप थकलेय.'
खूपच.
'हॅलो...'
त्याच अशक्य सेक्सी आवाजातला फोन
'आज या नंबरवरनं फोन कसा केलास रे?
शिट्, तू आलायस इकडे!
'येस मॅडम. कधी भेटायचं?'
'तू सांग.'
'मी काय सांग, तू बिझी.
मी तर सुटीवर आलोय.
'उद्या ठरवू.'
'कुठे भेटायचं?
मागच्या वेळसारखं लँड्स एण्ड?'
'बघते, आज जमेलसं वाटत नाहीये.'
'क्या यार?'
'आय नो. तू किती दिवस आहेस?'
'तीनचार. कामं आहेत बरीच,
आज तुझ्यासाठी संध्याकाळ ठेवली होती मोकळी.'
'साॅरी डियर, नाही जमणार.'
'एनी प्राॅब्लेम अॅट होम?'
'नाही नाही, सगळं ठीकेय.'
'मग?'
'हं...'
'हं काय, तू अव्हाॅइड करतेयस...'
'नाही रे.'
'हो.'
'बरं हाे.'
'का?'
'माहीत नाही, सांगता येत नाही.'
'त्या जाहिरातीतल्यासारखं
'सहन होत नाही आणि सांगता येत नाही?'
'जोक नकोय फालतू, प्लीज.'
'तरी पण...'
'आय अॅम नाॅट रेडी.'
'रेडी फाॅर व्हाॅट?'
'फाॅर यू'
'कमाॅन. काहीही.'
'बिलिव्ह मी'
'बाय.'
'हॅलो...'
त्यांच्यातला हा अंतरांचा, खऱ्याखोट्याचा, प्रीटेंड अँड प्ले
संपवायची वेळ आली होती.
दोघांनाही हे ठाऊक होतं.
तिनेच पाऊल उचलायला हवं होतं.
थांबवणारं तर कोणीच नव्हतं.
खरंच नव्हतं कोणी
तिच्या स्वत:शिवाय
आणि तरीही...
- मृण्मयी
सकाळी पोळ्या करताना घामाने चिंब झाली होती ती
जवळच ठेवलेला रुमाल घेऊन घाम पुसताना
त्याचा आवाज कानात घुमला,
'अशी घामट साॅलिड सेक्सी वाटतेस तू!'
उन्हाळ्याच्या सुटीमुळे काहीशा रिकाम्या लोकलमध्ये टेकायला मिळालं सकाळी तिला.
पहिल्यांदाच फोन हातात घ्यायला मिळाला होता सकाळपासून.
त्याने पिंग केलं होतं नुकतंच.
कधीतरी मूडमध्ये असताना करतो तसं आॅडिओ,
त्याच्या अशक्य सेक्सी, नुकतीच जाग आलेल्या आवाजात,
'कुठे आहेस, काय घातलंयस?'
आजूबाजूला असलेल्या बायांचा विचार न करता,
तिनेही आॅडिओ पाठवला,
"आज साडी नेसलेय खूप दिवसांनी,
आणि स्लीव्हलेस ब्लाउज.
पण तू अजून बेडमध्येच असशील ना,
नेहमीच्या ब्लॅक शाॅर्टसमध्ये?'
अपेक्षेनुसार व्हिडिओ काॅल आलाच लगेच
"इकडे ये ना...'
"हो, आलेच, तिथेच तर निघालेय.'
"नाही, खरी ये.'
"येतेच.'
"उडत ये.'
"ही काय, पोचलेच की.'
पोचल्यानंतर पुढे काही बोलण्याची गरजच पडली नाही त्यांना.
फोनचं नेटवर्कही गेलंच होतं नेहमीप्रमाणे.
रात्री अंथरुणावर पाठ टेकतेय तोच पिंग
'काय करतेयस, काय घातलंयस?'
'तुझा मळकट मऊ नाइटगाउन ना?'
'हो, तोच.'
"ये ना मग.'
'नको, तू तर आॅफिसात असशील.
आणि आता मी खूप थकलेय.'
खूपच.
'हॅलो...'
त्याच अशक्य सेक्सी आवाजातला फोन
'आज या नंबरवरनं फोन कसा केलास रे?
शिट्, तू आलायस इकडे!
'येस मॅडम. कधी भेटायचं?'
'तू सांग.'
'मी काय सांग, तू बिझी.
मी तर सुटीवर आलोय.
'उद्या ठरवू.'
'कुठे भेटायचं?
मागच्या वेळसारखं लँड्स एण्ड?'
'बघते, आज जमेलसं वाटत नाहीये.'
'क्या यार?'
'आय नो. तू किती दिवस आहेस?'
'तीनचार. कामं आहेत बरीच,
आज तुझ्यासाठी संध्याकाळ ठेवली होती मोकळी.'
'साॅरी डियर, नाही जमणार.'
'एनी प्राॅब्लेम अॅट होम?'
'नाही नाही, सगळं ठीकेय.'
'मग?'
'हं...'
'हं काय, तू अव्हाॅइड करतेयस...'
'नाही रे.'
'हो.'
'बरं हाे.'
'का?'
'माहीत नाही, सांगता येत नाही.'
'त्या जाहिरातीतल्यासारखं
'सहन होत नाही आणि सांगता येत नाही?'
'जोक नकोय फालतू, प्लीज.'
'तरी पण...'
'आय अॅम नाॅट रेडी.'
'रेडी फाॅर व्हाॅट?'
'फाॅर यू'
'कमाॅन. काहीही.'
'बिलिव्ह मी'
'बाय.'
'हॅलो...'
त्यांच्यातला हा अंतरांचा, खऱ्याखोट्याचा, प्रीटेंड अँड प्ले
संपवायची वेळ आली होती.
दोघांनाही हे ठाऊक होतं.
तिनेच पाऊल उचलायला हवं होतं.
थांबवणारं तर कोणीच नव्हतं.
खरंच नव्हतं कोणी
तिच्या स्वत:शिवाय
आणि तरीही...
- मृण्मयी
Comments
Post a Comment