माझा जन्म मुंबईचा, अख्खं आयुष्य इथेच गेलेलं. त्यामुळे गुजराती भाषा सतत कानावरून जाणारी. सख्ख्या मैत्रिणी नसल्या कोणी तरी शेजारी होतेच. अर्थात मुंबईतल्या गुजरात्यांना मराठीही येत असतं बऱ्याचदा. त्यामुळे थेट त्यांच्याशी त्या भाषेत संवाद साधायची वेळ फार येत नाही. परंतु तरीही मने गुजराती आवडतु. आवडते आणि येतेही. इतक्या वर्षांत गुजराती वाचन वर्तमानपत्रातल्या बातम्यांची शीर्षकं, दुकानांची नावं वा माणसांची नावं इतपतच मर्यादित होतं. बोललेलं कळत होतंच अर्थात.
सोलापुरातल्या डाॅ. प्रतिभा काटीकर या अनेक भाषा जाणणाऱ्या, एक उत्तम वाचक, शिक्षक. दिव्य मराठीच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. दिनकर जोषी यांच्या एका सदरातील पन्नासेक लेखांचा अनुवाद त्यांनी माझ्या हातात ठेवला, गुजरातीतून मराठी केलेला. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सदर होतं. अनुवाद वाटतच नव्हता, इतकं ओघवत्या शैलीत ते लिहिलेलं होतं. वाचकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. मी त्यांना काटीकर आजी म्हणते. आजींचा जन्म व बालपण गुजरातेत गेल्यानं गुजराती त्यांना मातृभाषा मराठीइतकीच उत्तम येते. नंतर पुण्यात वास्तव्य, त्यामुळे मराठीवर प्रभुत्व मिळालं. इंग्रजी साहित्यात तर त्यांची डाॅक्टरेट आहे. या आजींनी शोभा बोंद्रे यांच्या गाजलेल्या 'नाॅट ओन्ली पोटेल्स' या पुस्तकाचा गुजराती अनुवाद चार वर्षांपूर्वी केला होता. काही कारणांनी त्याचं प्रकाशन लांबणीवर पडत गेलं. अखेर जून अखेरीस पुस्तक त्यांच्या हातात आलं, आणि त्यांच्याकडून माझ्याकडे आलं. मला त्या म्हणाल्या, ओळखीचं कोणी गुजराती वाचणारं असेल तर हे वाचून अभिप्राय देता येईल का? म्हटलं नक्कीच. तेव्हाही मी ते वाचेन अशी शक्यताही लक्षात आलेली नव्हती. पण सोलापूरहून परत आल्यावर मी ते सहज हातात घेतलं आणि केव्हा वाचायला लागले, ते लक्षातही आलं नाही. अमेरिकेत अत्यंत लक्षणीय व्यवसाय करणाऱ्या, भारतात सर्वसामान्य घरांत जन्मलेल्या गुजराती व्यक्तींच्या गोष्टी सांगणारं हे पुस्तक. पहिल्या पानापासूनच त्याने माझी पकड घेतली. गुजराती मला इतकं सोपं जाईल, हे अजिबातच वाटलं नव्हतं. मी अौपचारिकरीत्या न शिकलेल्या भाषेत काहीतरी वाचतेय, ही भावनाच मला हे पुस्तक वाचताना आली नाही. गुजराती आणि मराठीत अनेक शब्द समान आहेत, लिपी वेगळी असली तरी ऊर्दू किंवा दाक्षिणात्य भाषांइतकी परकी नाही. आणि या असामान्य माणसांची आयुष्यंच इतकी रोचक होती की मी त्यात सहजी गुंतून गेले.
गुजरातेतल्या छाेट्या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा, शेतमजुरीतून फार पैसे मिळत नाहीत म्हणून गाव सोडून जातो, अथक मेहनत करतो. वडलांचं कर्ज फेडतो. गावात एकाकडून सुरतमधल्या हिऱ्यांना पाॅलिश करण्याच्या कामाबद्दल कळल्यावर तिथे जातो. पैसे देऊन प्रशिक्षण घेतो, तिथेच कामाला लागतो. बायको असतेच बरोबर, ती खाणावळ सुरू करते. हातात बरे पैसे येऊ लागतात. तिघा धाकट्या भावांना तिथे बोलावतो. हिरे व्यापारात चार महत्त्वाची कामं असतात, पाॅलिश करायला हा शिकलेला असतो, बाकीची तीन तिघा भावांना शिकवतो. यथावकाश स्वत:चं युनिट टाकतो, हळूहळू यंत्रांची संख्या वाढत जाते, संपन्नता येत जाते. हिऱ्यांचा व्यापार सुरू करतो. युरोपात अँटवर्पला जाऊन आंतरराष्ट्रीय व्यवहार कसा चालतो, ते हा माणूस शिकतो, इंग्रजीचा गंध नसताना. आता त्यांची जगभरात अनेक ठिकाणी कार्यालयं आहेत. व्यवसाय मुलानातवांच्या हातात दिल्यावर तो पुन्हा आपल्या गावात येतो, शेती करतो आणि गावात चांगली शाळा बांधून देतो. ही पहिली गोष्ट, भीमजीभाई पटेल यांची. गुजराती माणूस कष्टांना घाबरत नाही, हे दिसतं यातनं. आणि ते पुढच्या सर्व गोष्टींमधनं समोर येतच राहातं.
बाकीच्या गोष्टींमधल्या व्यक्ती १९६०, ७०च्या दशकात अमेरिकेत गेलेल्या. काही शिकायला, काही नोकरी करायला. पण धंदा करायचा मूळ स्वभाव कधी ना कधी डोकं वर काढतोच. मग एक जण चक्क एक ११ खोल्यांचं मोटेल विकत घेतो. त्याची नोकरी सुरू असतेच, त्या वेळात बायको मोटेल पाहाते, ती साडी नेसते, इंग्रजी फार येत नाही. त्या काळात अमेरिकनांना भारतीयांची, त्यांच्या पेहरावाची इतकी सवय नव्हती झालेली. तेव्हा तिथे भारतीय खाद्यपदार्थ, भाज्या वगैरेही मिळत नसता, या काळातली ही गोष्ट. आज या कुटुंबाच्या, व त्यांच्या सग्यासोयऱ्यांच्या, ज्यांना यांनीच तिथे बोलवून घेतलेलं, ६०हून अधिक मोटेल्स आहेत. हे दलपतभाई पटेल त्यांच्या शहराचे मेयर म्हणूनही निवडून आले आहेत.
हसु आणि हर्षा शाह यांनी एका मोटेलपासून सुरुवात केली, आज त्याची कंपनी शंभराहून अधिक हाॅटेल्सची मालक आहे. त्यांची मुलंही याच व्यवसायात आहेत. हिल्टन, मॅरियट, वगैरेही यात आहेत.
जयदेव पटेल, न्यू याॅर्क लाइफ या विमा कंपनीचे रेकाॅर्डब्रेकर एजंट. अब्जावधी डाॅलरचा धंदा त्यांनी केलेला आहे. हे मूळचे केमिस्ट बरं. आणि अबोल. आज त्यांच्या पाच हजारांहून अधिक ग्राहकांची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. I am not an insurance agent, I am a caretaker of the families हे त्यांचं तत्त्व. त्याला अनेक मानसन्मान मिळालेले आहेत.
या सगळ्यांच्या बायका त्यांच्या अखंड सोबत आहेत, खांद्याला खांदा लावून अपार मेहनत त्यांनी केली आहे. दहापंधरा जणांचा स्वयंपाक, अमेरिकी पद्धतीप्रमाणे घरातलं कामही स्वत: करणाऱ्या, नोकरीही करणाऱ्या. मोटेलवाल्याने तर बायकोला गवंडी, रंगारी, प्लंबर सगळं काम शिकवलं आणि तिने केलंही. एक जण आठ दिवसांची बाळंतपणाची रजा झाल्यानंतर बाळाला गुजराती बाईकडे सांभाळायला ठेवून जाणारी. सगळ्यांचे भारताशी, त्यांच्या खेड्याशी संबंध मजबूत आहेत. आपल्या भाईबंदांना मदत करण्याचा गुणही सर्वांमध्ये दिसतो. एकीने म्हटलंय, मी लग्न करून रोमँटिक कल्पना घेऊन अमेरिकेत आले तो काय, आमच्या छोट्याशा घरात आठदहा जण राहात होते. माझ्या पतीला अमेरिकेत पाय ठेवल्यानंतर दोन जुन्या, अचानक समोर आलेल्या मित्रांनी आसरा दिला होता, ते तो कधीच विसरला नाही आणि त्याने इतरांना मदत करायची संधी कधी सोडली नाही.
पुस्तक वाचून मी एकुणात गुजरात्यांबद्दल खूप काही शिकले हे नक्की. मला अनेक किस्से इथे सांगायचा मोह होतोय, मी लेकीला किंवा आॅफिसातल्या माझ्या मैत्रिणीला रोज काय वाचलं ते आवर्जून सांगत होते. पण तुम्ही ते वाचावं, असं वाटतं. मूळ मराठी पुस्तक तसं जुनं आहे, पण आवर्जून वाचावं असं नक्कीच. या मूळ मराठी पुस्तकाचा इंग्रजी आणि हिंदी अनुवादही उपलब्ध आहे.

Comments
Post a Comment